Agriculture Scheme : महाराष्ट्र हे एक कृषीप्रधान राज्य आहे. राज्यात सोयाबीन, कांदा, टोमॅटो, डाळिंब, द्राक्ष, केळी इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र अनेकदा शेतकऱ्यांना शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने नुकसानीचा सामना करावा लागतो. अनेकदा शेतमालाची नासाडी देखील होते.
योग्य भाव मिळत नाही म्हणून शेतकऱ्यांना पिकासाठी आलेला खर्च देखील भरून काढता येत नाही. अशा परिस्थितीत राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमाल प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने 2017 पासून एक कौतुकास्पद योजना सुरू केली आहे.
या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य पुरवले जात आहे. यामुळे राज्यात अन्नप्रक्रिया उद्योगाला चालना मिळाली आहे. मात्र अजूनही राज्यात अन्नप्रक्रिया उद्योगाची कमतरता कायम आहे.
दरम्यान, शासनाने अन्नप्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रिया योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना 2017 पासून सुरू या योजनेचा अधिका-अधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा यासाठी आवाहन केले जात आहे.
या योजनेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून अन्नप्रक्रिया उद्योगाच्या 30 टक्के एवढे अर्थसहाय्य पुरवले जात आहे. अशातच या योजनेसंदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे.
ती म्हणजे राज्यातील अन्नधान्य प्रक्रिया, कडधान्य प्रक्रिया, फळ प्रक्रिया, भाजीपाला प्रक्रिया, बेकरी, बेदाणा निर्मिती, मसाले उत्पादने, राईस मिल, काजु प्रक्रिया, गुळ उत्पादन, तेलबिया प्रक्रिया आदी प्रकारच्या 645 कोटी रू. च्या 148 प्रकल्पांना नुकतीच मान्यता देण्यात आली आहे.
राज्यस्तरीय बैठकीत या प्रकल्पांना मान्यता देण्याचा महत्त्वाचा निर्णय झाला आहे. अशा परिस्थितीत आज आपण या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किती अर्थसहाय्य मिळते आणि या योजनेच्या लाभासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात याविषयी जाणून घेणार आहोत.
किती आर्थिक सहाय्य मिळते?
मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत अन्न प्रक्रिया उद्योगाला प्रकल्पाच्या किमतीच्या 30% किंवा जास्तीत जास्त 50 लाखांपर्यंतचे अनुदान दिले जाते. हे आर्थिक सहाय्य लाभार्थी अर्जदाराने प्रकल्प उभारणी केल्यानंतर दिले जाते. दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन केले जात आहे.
कोण कोणती कागदपत्रे लागतात?
मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत अन्न प्रक्रिया उद्योगासाठी दिल्या जाणाऱ्या आर्थिक सहाय्याचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.
यासाठी विहित नमुन्यातील मुळ अर्ज, बँकचे कर्ज मंजुरी पत्र ( Term Loan ) व बँकेने केलेले मुल्यांकन ( Bank Appraisal ), 7/12, 8 अ (तीन महिन्याच्या आतील मुळप्रत) /भाडेकरारनामा, उद्योजकाचे आधार कार्ड व पॅनकार्ड / फर्मचे पॅनकार्ड, प्रकल्पाचा डीपीआर (DPR) व प्रक्रिया फ्लो चार्ट, करारनामा, प्रकल्पासाठी लागणारी संयंत्रे (Plant & Machinary) साहित्याची पुरवठादाराकडील दरपत्रके ( Quatation), इमारतीची ब्ल्यू प्रिंट. (Bank Attested), उद्यम आधार नोंदणी प्रमाणपत्र ही महत्वाची कागदपत्रे सादर करावी लागतात.
विहित नमुन्यातील अर्ज कुठं डाऊनलोड करणार
https://acrobat.adobe.com/link/track?uri=urn:aaid:scds:US:c49da2ac-66c0-34ac-a4a2-c7238c7ce942 या लिंक वर या योजनेसाठीचा विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध आहे.