Agriculture Scheme : भारत हा शेतीप्रधान देश (Agriculture Country) असून आपल्या देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या शेतीवर (Farming) अवलंबून आहे. अशा परिस्थितीत देशातील शेतकऱ्यांच्या (Farmer) कल्याणासाठी भारत सरकार तसेच वेगवेगळ्या राज्यातील राज्य सरकारे (State Government) आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी वेगवेगळ्या शेतकरी हिताच्या योजना (Farmer Scheme) कार्यान्वित करत असतात.
आपल्या भारत देशात गेल्या अनेक शतकांपासून शेती हा एक मुख्य व्यवसाय असून शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन (Animal Husbandry) मोठ्या प्रमाणात केले जात आहे. संपूर्ण भारतवर्षात पशुपालन व्यवसायात दिवसेंदिवस वाढ होत आहे. पशुधनाची संख्या वाढत आहे, त्यामुळे हिरव्या चाऱ्याचा पुरवठा हा चिंतेचा विषय बनला आहे.
काही राज्यांमध्ये जनावरे आणि शेतकऱ्यांना चारा पुरवठ्यासाठी इतर राज्यांवर अवलंबून राहावे लागते. हरियाणा राज्यात देखील चाऱ्याचा मोठा शोर्टज निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देणारी हरा चारा बिजाई योजना हरियाणा राज्यात चालवली जात आहे.
या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना जनावरांसाठी हिरवा चारा तयार करण्यासाठी किंवा लागवड करण्यासाठी 1 लाखांपर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे. निश्चितच हरियाणा राज्यातील शेतकरी बांधवांचा यामुळे मोठा फायदा होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून दिली जाणारीआर्थिक सबसिडी फक्त त्या शेतकर्यांना मिळणार आहे, जे हिरवा चारा लागवड करतील आणि हरियाणा राज्यातील गोशाळाला विकतील. एवढेच नाही तर या योजनेतील आर्थिक अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. यामुळे निश्चितच या योजनेचा सरळ शेतकरी बांधवांना फायदा होणार आहे.
या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे
हरियाणा सरकारद्वारे राबविण्यात येत असलेल्या हिरवा चारा बीजन योजनेंतर्गत केवळ हरियाणा राज्यातील शेतकऱ्यांनाच अनुदानाचा लाभ मिळणार आहे. या योजनेंतर्गत अर्ज केल्यानंतर, शेतकऱ्याला त्याच्या शेतात हिरवा चारा आणि कोरडा चारा घ्यावा लागेल, ज्यासाठी प्रति एकर 10,000 रुपये दराने जास्तीत जास्त 1 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाईल. या योजनेमुळे गोठ्यासह वैयक्तिक जनावरांसाठी देखील चारा पुरवठा होणारं आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान मिळणार असल्याने त्याना दिलासा मिळणार आहे.