Agriculture News: भारतीय शेतीत (Agriculture) काळाच्या ओघात मोठा बदल केला जात आहे. मात्र शेतीमध्ये (Farming) परिवर्तन होत असले तरी शेती करणे ही दिवसेंदिवस खर्चिक बाब बनत चालली आहे. उत्पादन खर्चात मोठ्या झपाट्याने वाढ होत असल्याने शेतकरी बांधवांच्या उत्पन्नात (Farmer Income) मोठी घट होत आहे.
मात्र असे असले तरी आता असे अनेक तंत्रज्ञान आहेत ज्याच्या मदतीने शेतकरी बांधव (Farmer) उत्पादन खर्चात बचत करू शकणार आहेत. मित्रांनो अशा अनेक शेतीच्या पद्धती आहेत ज्यामुळे उत्पादन खर्च अतिशय नगण्य राहणार आहे.
झिरो बजेट फार्मिंग (Zero Budget Farming) हेदेखील असेच एक तंत्रज्ञान किंवा पद्धत आहे. झिरो बजेट फार्मिंग च्या माध्यमातून उत्पादन खर्चात मोठी कपात केली जाते परिणामी उत्पन्नात वाढ होते. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया झिरो बजेट फार्मिंग म्हणजे नेमके काय.
झिरो बजेट फार्मिंग म्हणजे नेमकं काय बरं…!
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी इथे नमूद करू इच्छितो की, झिरो बजेट फार्मिंग अंतर्गत, पिकांच्या उत्पादनात रासायनिक खतांच्या जागी नैसर्गिक खतांचा वापर केला जातो. म्हणजेच झिरो बजेट फार्मिंग सेंद्रिय शेतीचाचं भाग आहे. यामध्ये रासायनिक कीटकनाशकाचा वापर देखील केला जात नाही.
मित्रांनो महाराष्ट्रातील कृषी शास्त्रज्ञ सुभाष पाळेकर यांना झिरो बजेट फार्मिंग तंत्रज्ञानाचे जनक म्हणून ओळखले जाते. जीव-अमृत हा शून्य बजेट नैसर्गिक शेतीचा आधार आहे. यामध्ये शेण, मूत्र आणि पानांपासून खत आणि कीटकनाशके वापरली जातात. असे करताना शेतकऱ्यांना नगण्य खर्च येतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, या शेतीच्या प्रकारात जीवामृत, बीजामृत, अच्छदन-मल्चिंग, वाफसा यांचा खते आणि कीटकनाशके म्हणून वापर केला जातो. या चार गोष्टींना या शेती तंत्राचे प्रमुख आधारस्तंभ मानले जातात.
जमीन सुपीक बनते आणि उत्पादनात वाढ होते
नैसर्गिक कीटकनाशके आणि खतांचा वापर करून, शून्य बजेट नैसर्गिक शेती करताना जमिनीची सुपीकता राखली जाईल. अशा स्थितीत पिकांचे उत्पादनही पूर्वीच्या तुलनेत वाढेल आणि खर्चही कमी येतो. त्याचा परिणाम म्हणजे शेतकऱ्यांचा नफाही वाढणार आहे.
आरोग्यावर कोणताही वाईट परिणाम होत नाही
झिरो बजेट नैसर्गिक शेतीमध्ये रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर केला जात नाही. या तंत्रात शेतकरी केवळ नैसर्गिक गोष्टी वापरू शकतो. त्याचा लोकांच्या आरोग्यावर सर्वाधिक सकारात्मक परिणाम होईल. वास्तविक, रासायनिक खतांच्या वापरामुळे शेतकऱ्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असून, या शेतातून येणारे धान्य, भाजीपाला खाण्याबरोबरच सर्वसामान्यांचेही नुकसान होत आहे. मात्र नैसर्गिक शेतीमध्ये असे कोणतेही धोके नाहीत.