Agriculture News : शेतकरी बांधवांना (Farmer) हवामान बदलामुळे (Climate Change) मोठा फटका बसत असतो. हवामानाच्या लहरीपणामुळे शेतकरी बांधवांचे शेती पिके धोक्यात येत असतात.
कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ तर कधी ढगाळ हवामान (Cloudy Weather) यामुळे शेती पिकांवर विपरित परिणाम होतो परिणामी उत्पादनात घट होते आणि शेतकरी बांधवांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.
मात्र आता तंत्रज्ञानाच्या मदतीने हवामान बदलामुळे होणारे नुकसान शेतकरी बांधवांना कमी करता येणे सहज शक्य होणार आहे. मित्रांनो यावर्षी देखील पावसाच्या लहरीपणामुळे तसेच हवामान बदलामुळे शेतकरी बांधवांना नुकसान सहन करावे लागले आहे.
हवामानाची अचूक माहिती उपलब्ध झाली नसल्याने ज्या शेतकरी बांधवांनी लवकर पेरणी केली होती त्यांना नंतर पाऊस झाला नसल्याने नुकसान सहन करावे लागले आहे. तसेच काही शेतकरी बांधवांना अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.
आता अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि शेतकरी बांधवांना हवामानाची (Weather Update) अचूक माहिती वेळेत उपलब्ध व्हावी या अनुषंगाने एका भन्नाट ॲप्लिकेशनची (Farming Application) निर्मिती करण्यात आली आहे. या ॲप्लिकेशनच्या मदतीने शेतकरी बांधवांना हवामानाचा अचूक अंदाज बांधता येणार आहे यामुळे शेतकरी बांधवांना हवामानाचा अंदाज बांधून शेती कामे करता येणार आहेत.
कोणत आहे हे मोबाईल ॲप्लिकेशन बर…!
वेदर अँड रडार इंडिया ॲप शेतकरी बांधवांना हवामानाचा वेळेवर अंदाज देणार आहे. या ॲप्लिकेशनच्या मदतीने शेतकरी बांधवांना केव्हा पाऊस पडेल तसेच किंवा ढगाळ हवामान राहील किंवा केव्हा अतिवृष्टीची शक्यता आहे याची अचूक माहिती मिळणार आहे. यामुळे शेतकरी बांधवांना नुकसान टाळता येणे शक्य होणार आहे आणि शेतीची कामे करताना देखील हवामानाचा अंदाज बांधता येणार आहे. यामुळे शेतकरी बांधवांना शेती कामे करताना सोयीचे होणार असल्याचे जाणकार नमूद करत आहेत.
शेतकऱ्यांना नेमका कसा होणार फायदा बर…!
मित्रांनो खरे पाहता हवामान विभाग शेतकरी बांधवांना हवामानाचा अंदाज देत असते. मात्र या एप्लीकेशन ची विशेषता अशी आहे की हे अँप्लिकेशन दर तासाला शेतकरी बांधवांना हवामानाचा अंदाज येणार आहे. यामुळे शेतकरी बांधवांना हवामानाचा अंदाज बांधून शेतीची कामे करता येणार आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की एप्लीकेशन चा वापर आपल्या भारतातील जवळपास 5 कोटीहून अधिक लोक करत आहेत. याची सर्वात महत्त्वाची आणि चांगली गोष्ट म्हणजे हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध आहे. या एप्लीकेशन मध्ये हवामान थेट रडार नकाशे, मान्सून पावसाचा अंदाज, फार्म वेदर, 7 ते 14 दिवसांचा लोकल वेदर फोरकास्ट यांसारखी माहिती मिळेल.