Agriculture News : महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. खरे तर भारतात मक्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मक्याची लागवड खरीप हंगामात होते. त्याची लागवड ही दुहेरी उद्देशाने केली जाते. मक्याची शेती ही एक तर धान्य उत्पादनासाठी आणि सोबतच चाऱ्याच्या उत्पादनासाठी होत असते.
यासाठी या पिकाच्या वेगवेगळ्या जाती कृषी शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या आहेत. अशातच देशातील कृषी शास्त्रज्ञांनी मक्याची एक नवीन जात विकसित केले आहे. ही जात चाऱ्यासाठी विकसित करण्यात आली आहे. यामुळे पशुपालक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, हरियाणा कृषी विद्यापीठ, कर्नालच्या चौधरी चरण सिंग प्रादेशिक संशोधन केंद्राने पशुपालक शेतकऱ्यांसाठी मक्याची एक नवीन जात विकसित केली आहे. या जातीपासून पशुपालक शेतकऱ्यांना चाऱ्याचे विक्रमी उत्पादन मिळवता येणार आहे.
या जातीला H.Q.P.M. 28 असे नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणजे ही जात महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारशीत आहे. महाराष्ट्रासोबतच या जातीची उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये लागवड करता येणार आहे.
या जातीच्या मक्याचे लागवड केल्यानंतर 60 ते 70 दिवसात चाऱ्याचे उत्पादन घेता येते. या जातीपासून एकरी 220 क्विंटल पर्यंतचे चाऱ्याचे उत्पादन मिळू शकते असा दावा कृषी शास्त्रज्ञांनी केला आहे.
या चाऱ्याच्या संकरित जातीला पीक मानके आणि कृषी पिकांच्या वाणांचे प्रकाशन केंद्रीय उपसमितीने भारतात लागवडीसाठी मान्यता सुद्धा दिली आहे. खरे तर महाराष्ट्रासहित संपूर्ण भारतात शेती सोबतच पशुपालनाचा व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात केला जातो.
गाई, म्हशीचे पालन आपल्या देशात फार पूर्वीपासून केले जाते. मात्र या जनावरांचे पालन करून यातून चांगले दूध उत्पादन मिळवण्यासाठी त्यांना चांगला आहार द्यावा लागतो. जनावरांना हिरवा चारा दिल्यास दूध उत्पादन वाढते. दरम्यान हिरव्या चाऱ्यासाठी मक्याच्या चाऱ्याचा देखील वापर होतो.
अशा परिस्थितीत मक्याची ही जात पशुपालक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. जर तुम्हीही पशुपालनाचा व्यवसाय करत असाल तरही ही मक्याची जात तुमच्यासाठी देखील मोठी फायदेशीर ठरणार आहेत. या जातीच्या मक्याची लागवड करून तुम्ही चाऱ्याचे चांगले उत्पादन घेऊ शकणार आहात.