Agriculture News : तुम्ही माणसे दारू पितात असे ऐकले असेल, पाहिले असेल. पण शेती पिकांना देखील आता दारू पाजली जात आहे. दारुमुळे अनेक लोकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. मात्र ही दारू पिकांना फवारल्यावर शेतकऱ्यांना अधिकचे उत्पादन मिळत आहे. कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही मात्र मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश मधील काही शेतकरी शेती पिकांवर दारूची फवारणी करत आहेत.
विशेष म्हणजे दारू फवारल्यानंतर या शेतकऱ्यांना पिकांमधून चांगले उत्पादन मिळाले आहे. स्वतः यासंबंधीत शेतकऱ्यांनीच असा दावा केला आहे. पण खरंच दारू फवारल्याने चांगले उत्पादन मिळते का, पिकावर दारू फवारल्याने काय होते? याबाबत कृषी तज्ञांचे काय मत आहे? याबाबत आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
पिकांवर दारू फवारल्याने शेतकऱ्यांना चांगले फायदे मिळाले आहेत. यामुळे सध्या शेतकऱ्यांच्या या प्रयोगाची चर्चा होत आहे. पण कृषी शास्त्रज्ञांनी या संदर्भात धक्कादायक माहिती सांगितली आहे, ज्याबद्दल तुम्हाला माहिती असायला हवी.
शेतकरी काय म्हणतात
आता आपण सर्वप्रथम शेतकऱ्यांनी कोणत्या पिकांमध्ये अल्कोहोलचा वापर केला आहे आणि त्यातून त्यांना कोणते फायदे मिळाले आहेत? हे जाणून घेऊया. शेतकरी विविध पिकांवर दारूची फवारणी करत आहेत. ज्याचा त्यांना फायदा होत आहे.
मीडिया रिपोर्ट नुसार, मध्य प्रदेशातील अनेक शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी मूग पिकावर दारू फवारली, त्यानंतर त्यांना अधिक उत्पादन मिळाले आहे. दारू फवारल्यामुळे पिकातून दुप्पट उत्पादन मिळत असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.
याची फवारणी करतानाही त्यांना कोणतीही अडचण येत नाही. शेतकरी सांगतात की त्यांनी इतर कीटकनाशकांची फवारणी केली तर त्यांचे आरोग्य बिघडते. पण दारू फवारल्याने शेतातील किडे मरतात, मात्र शेतकऱ्यांवर याचा विपरीत परिणाम होत नाही.
दारू फवारल्याने पिकांना नशा होते आणि जास्त उत्पादन मिळते अशी शेतकऱ्यांची धारणा आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी बटाटा पिकांवरही अल्कोहोलची फवारणी केली आहे आणि याचा चांगला फायदा होईल अशी आशा इथल्या शेतकऱ्यांना आहे.
कृषी तज्ञ काय म्हणतात
दारू फवारल्याने पिकाचे उत्पादन वाढते हा शेतकऱ्यांचा समज पूर्णपणे चुकीचा आहे अशी माहिती कृषी शास्त्रज्ञांनी दिली. पिकांना दारू फवारून शेतकऱ्यांना काहीच फायदा होणार नाही. मात्र शेतकऱ्यांनी दारू आणि कीटकनाशकांची फवारणी केली तर याने केमिकल रिएक्शन होऊ शकते.
यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागू शकते. हेच कारण आहे की कृषी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांनी पिकांवर दारूची फवारणी करू नये, असा सल्ला दिला आहे. दारू फवारल्याने फायदा तर होणार नाही, पण नुकसान मात्र सहन करावे लागू शकते.