Agriculture News : महाराष्ट्रात रब्बी हंगामामध्ये गहू आणि हरभरा या दोन पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. गतवर्षी जून ते सप्टेंबर 2023 या मान्सून कालावधीत समाधानकारक पाऊस बरसला नसल्याने खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम प्रभावित झाला आहे.
कमी पावसामुळे हरभरा लागवडीखालील क्षेत्र देखील कमी झाली आहे. याशिवाय मानसूनोत्तर झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे हरभरा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना हरभऱ्याची दुबार पेरणी देखील करावी लागली होती. आता मात्र रब्बी हंगामातील हरभऱ्याची हार्वेस्टिंग पूर्ण झाली असून मळणीअंती शेतकरी बांधव हरभरा विक्रीसाठी बाजारात घेऊन जात आहेत.
अशातच, राज्यातील हरभरा उत्पादकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे महाराष्ट्राच्या एका बड्या मार्केटमध्ये हरभऱ्याचे भाव 11 हजार रुपये प्रति क्विंटलच्या घरात पोहोचले आहे.
यामुळे नैसर्गिक संकटामुळे झालेल्या हरभरा पिकाचे नुकसान विक्रमी बाजारभावातून भरून निघेल अशी आशा आता व्यक्त होत आहे.
कुठं मिळाला सर्वोच्च भाव ?
हरभरा उत्पादनासाठी विशेष ओळखल्या जाणाऱ्या उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात हरभऱ्याला सर्वोच्च भाव मिळाला आहे. खरेतर, रब्बी हंगामात कमी पावसामुळे हरभऱ्याचे लागवडीखालील क्षेत्र कमी झाले आहे.
जिल्ह्यात हरभऱ्याचे पेरणी क्षेत्र 18 हजार हेक्टर पेक्षा कमी झाले आहे. यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येणार आहे. परिणामी सध्या बाजारपेठांमध्ये हरभऱ्याला विक्रमी भाव मिळत आहे.
जिल्ह्यातील शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पीकेव्हीटू जातीच्या हरभऱ्याला दहा हजार 400 रुपये असा भाव मिळाला आहे. आतापर्यंत शहादा एपीएमसी मध्ये 1 हजार पाचशे क्विंटल हरभरावर झाली आहे.
दर दिवशी 300 क्विंटल आवक या एपीएमसीमध्ये नमूद केली जात आहे. विशेष म्हणजे आगामी काळात ही आवक वाढेल असा अंदाज आहे.
दरम्यान, जाणकार लोकांनी गेल्या तीन वर्षात पहिल्यांदाच हरभऱ्याला एवढा विक्रमी भाव मिळत असल्याची माहिती दिली आहे. यामुळे राज्यातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.