Agriculture News : महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांमध्ये निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसत आहे. अवकाळी, अतिवृष्टी, ढगाळ हवामान, गारपीट, कीड, रोगराई, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे बेजार झालेल्या शेतकऱ्यांसाठी पिक विमा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीच्या मोबदल्यात संबंधितांना नुकसान भरपाई मिळत आहे.
यामुळे काही प्रमाणात नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळतो. मात्र या पिक विमा योजनेत अनेक त्रुटी आहेत. अनेकदा नुकसान झालेले असतानाही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवण्यासाठी पिक विमा कंपन्यांच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात.
खरे तर पिक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचे जर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले तर संबंधित पीक विमा धारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम केव्हा मिळणार, किती नुकसान भरपाई मिळणार याबाबत माहिती देण्यासाठी कोणतीच यंत्रणा अथवा व्यवस्था विकसित झालेली नाही.
यामुळे शेतकऱ्यांना पिक विमा भरपाई संदर्भात कोणतीच माहिती उपलब्ध होत नाही. आता मात्र शेतकऱ्यांची ही समस्या निकाली निघणार आहे.
केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय एक टोल फ्री क्रमांक जारी करणार आहे. यामुळे पिक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांच्या समस्येचे टोल फ्री क्रमांकामुळे पूर्णपणे निराकरण होणार आहे.
खरे तर याबाबतचा पायलट प्रोजेक्ट नुकताच छत्तीसगड मध्ये राबविण्यात आला होता. विशेष बाब अशी की, हा पायलट प्रोजेक्ट यशस्वी देखील झाला आहे.
दरम्यान संपूर्ण देशातील पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांसाठी आता १४४४७ हा टोल फ्री क्रमांक जारी केला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा टोल फ्री क्रमांक येत्या आठवड्यात शेतकऱ्यांसाठी जारी होणार आहे.
यामुळे पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याच्या दाव्याची माहिती मिळू शकणार आहे. विशेष म्हणजे या टोल फ्री क्रमांकावरून शेतकऱ्यांना पीक विमा संबंधित तक्रारही करता येणार आहे.