Agriculture News : महाराष्ट्रात खरीप हंगामामध्ये सोयाबीन, कापूस आणि कांदा या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. याशिवाय आपल्या राज्यात धान अर्थातच तांदूळ या पिकाची देखील खरीपात मोठ्या प्रमाणात लागवड होते. आपल्या महाराष्ट्रात धान पिकाची रोवणी ही कोकण आणि विदर्भ विभागात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते.
कोकण आणि विदर्भातील शेतकऱ्यांचे धान पिकावर अर्थकारण अवलंबून आहे. आपल्याकडे धानाच्या वेगवेगळ्या जातींची लागवड केली जाते. महाराष्ट्रासह देशातील इतरही राज्यात धानाची मोठ्या प्रमाणात लागवड होते.
हेच कारण आहे की, शेतकऱ्यांसाठी सरकारने कमी किमतीत धानाचे अर्थातच तांदळाचे बियाणे उपलब्ध करून देण्यास सुरवात केली आहे.
राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून देशातील शेतकऱ्यांना कमी किमतीत धानाचे बियाणे उपलब्ध करून दिले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय बियाणे महामंडळ देशातील शेतकऱ्यांना कमी किमतीत पुसा बासमती 1692 या जातीचे बियाणे उपलब्ध करून देत आहे.
दरम्यान, आज आपण तांदळाच्या या जातीची विशेषता थोडक्यात जाणून घेणार आहोत तसेच तांदळाचे हे बियाणे घरबसल्या शेतकऱ्यांना कसे मागवता येऊ शकते ? याविषयी देखील आज आपण माहिती पाहणार आहोत.
पुसा बासमती 1692 जातीच्या विशेषता
भारतीय शास्त्रज्ञांनी विकसित केलेली तांदळाची ही एक सुधारीत जात आहे. या जातीची रोवणी देशातील अनेक राज्यांमध्ये केली जाते. या जातीचे पीक 110 ते 120 दिवसात हार्वेस्टिंगसाठी तयार होत असल्याची माहिती कृषी तज्ञांनी दिली आहे.
बासमती तांदळाचे दाणे हे लांब असतात. या जातीचा बासमती तांदूळ देखील लांब आणि सुगंधित आहे. यामुळे बाजारात या जातीच्या तांदळाला मोठी मागणी असते. परिणामी याला चांगला भाव मिळतो आणि शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते.
या जातीचा तांदूळ हा परदेशात देखील निर्यात होतो. या जातीच्या तांदळाची लागवड करून शेतकऱ्यांना लाखो रुपयांची कमाई करता येत आहे. जर तुम्हाला या जातीचे धानाचे बियाणे हवे असेल तर तुम्ही स्वस्तात हे बियाणे घरबसल्या मागवू शकणार आहेत.
कुठून मागवणार पुसा बासमती 1692 चे बियाणे ?
जर तुम्हाला या जातीचे बियाणे मागवायचे असेल तर तुम्ही ते घरबसल्या राष्ट्रीय बियाणे महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून मागवू शकणार आहात. या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला या जातीचे 10 किलो बियाणे 800 रुपयांना मिळणार आहे.
बाजाराशी तुलना केली असता तुम्हाला राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून हे बियाणे स्वस्तात मिळणार आहे. https://www.mystore.in/en/product/mustard-rh-761-certified-seed-2-kg-bag या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही पुसा बासमती 1692 या जातीचे बियाणे ऑर्डर करू शकता.