Agriculture News : महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या पन्नास हजार प्रोत्साहन पर अनुदानाबाबत एक मोठी माहिती हाती आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदानासाठी एक नवीन पोर्टल विकसित करण्यात आले आहे. हे नवीन पोर्टल महाआयटीच्या माध्यमातून विकसित झाला आहे.
दरम्यान आता हे पोर्टल विकसित झाल्याने या योजनेला गती लाभणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार आता या योजनेअंतर्गत पहिल्या आणि दुसऱ्या यादीत पात्र असलेल्या आणि आधार प्रमाणीकरण केलेल्या शेतकऱ्यांना 1 फेब्रुवारी 2023 पासून प्रत्यक्ष अनुदान मिळण्यास सुरुवात झाली आहे.
ज्या शेतकऱ्यांची या पहिल्या आणि दुसऱ्या यादीत नावे आले आहेत तसेच ज्यांनी आपल आधार प्रामाणिकरण केल आहे अशा शेतकऱ्यांना येत्या तीन दिवसात योजनेअंतर्गत अनुदानाची रक्कम वितरित केली जाणार असल्याची माहिती एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मध्ये देण्यात आली आहे. निश्चितच गेल्या अनेक दिवसांपासून प्रोत्साहन अनुदानाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ दिवशी जमा होणार 50 हजाराच अनुदान, पहा डिटेल्स