Agriculture News: भारतातील शेतकरी बांधव (Farmer) गेल्या अनेक वर्षांपासून शेती समवेतच (Farming) पशुपालन व्यवसाय (Animal Husbandry) मोठ्या प्रमाणात करत आले आहेत. पशुपालन व्यवसाय अल्पभूधारक शेतकरी बांधवांसाठी अतिरिक्त उत्पन्न (Farmer income) कमवण्याचे एक प्रमुख साधन बनले आहे.
जाणकार लोक सांगतात की, पशु निरोगी राहिले तर त्यांच्यापासून शुद्ध दूध उत्पादन मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुपटीने वाढ होणार आहे. पशुपालक शेतकरी बांधव (Livestock Farmer) देखील दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी पशु निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करतो.
यासाठी जनावरांना पौष्टिक चारा, हिरवा चारा आणि तेलबीज पोळी दिली जाते, मात्र बाजारात या सर्व मालाची किंमत खूप जास्त असल्याने जनावरांना उपलब्ध करून देणे नेहमीच थोडे कठीण जाते. अशा परिस्थितीत, भारतीय शास्त्रज्ञांनी प्राण्यांसाठी भरपूर पोषण असलेल्या UMMB कॅटल चॉकलेटचा (Chocolate For Animals) शोध लावला आहे, ज्याच्या मदतीने जनावरांना योग्य पोषण मिळेल आणि ते अधिक दूधही देऊ शकतील. यामुळे आता गोठ्यात बांधलेल्या गाई म्हशी देखील मानवाप्रमाणेच चोकलेट मोठ्या चवीने खाणार आहेत.
UMMB अॅनिमल चॉकलेट आहे तरी नेमकं कसं बरं…!
दुग्धव्यवसाय करणारे शेतकरी बांधव दुग्ध उत्पादन वाढवण्यासाठी आपल्या पशूंना नेहमीच सकस आहार देत असतात. मात्र आता भारतीय वैज्ञानिकांनी पशूंना सकस आहार म्हणून चॉकलेटची निर्मिती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पशुपालकांमध्ये हे चॉकलेट आता वेगाने प्रसिद्ध होत आहे. यामुळे गाई आणि म्हशींची तसेच दुभत्या जनावरांची दूध देण्याची क्षमता वाढते आणि कमकुवत जनावरांना चपळता येत असल्याचा दावा पशु वैज्ञानिक तसेच पशुपालक शेतकरी करत आहेत
UMMB चॉकलेट भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था, बरेली यांनी तयार केले आहे. जे सामान्य दुभत्या जनावरांसह वासरांच्या आरोग्याची काळजी घेते. हे चॉकलेट फक्त रुमिनंट्ससाठी डिझाइन केलेले आहे. ही चॉकलेट्स या जनावरांना खायला दिल्यास दुधाचे उत्पादन वाढते आणि दुधाचा दर्जाही चांगला होतो.
UMMB चॉकलेट्सची खासियत
हे सामान्य चॉकलेट नाही तर त्यात मोहरीचे तेल, कॅल्शियम, जस्त, मीठ, तांबे, मॅग्नेशियम आणि कोंडा यांसारखी खनिजे देखील असतात. त्यामुळे जनावरांची पचनशक्तीही मजबूत होऊन त्यांची भूक वाढते.
पोषण आणि मीठ नसल्यामुळे अनेकदा अनेक प्राणी भिंत आणि जमीन चाटत राहतात. या सर्व समस्यांसह जनावरांना आवश्यक ते पोषक तत्व हे चॉकलेट पुरवते, जेणेकरून जनावरांना अशक्तपणा वाढत नाही.
प्रथिनयुक्त सामग्रीने समृद्ध हे चॉकलेट प्राण्यांना निरोगी बनवून त्यांची प्रतिकारशक्ती वाढवते, ज्यामुळे प्राणी दीर्घकाळ निरोगी राहतात.