Agriculture News : पीएम किसान सन्मान निधी योजनेचा तेरावा हफ्ता केव्हा मिळेल हा प्रश्न देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांना पडला आहे. खरं पाहता ही योजना केंद्र शासनाच्या माध्यमातून चालवली जाते. या योजनेला संपूर्ण अर्थसहाय्य केंद्र सरकारच देते. मात्र ही योजना राज्यस्तरावर कृषी विभाग आणि महसूल विभागाच्या माध्यमातून राबवली जाते.
या योजनेच्या माध्यमातून शासनाकडून वार्षिक एकूण सहा हजार रुपये पात्र शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने दिले जातात. 2000 चा एक हप्ता या पद्धतीने हे पैसे मिळतात. आतापर्यंत 12 हप्ते मिळाले असून 13 व्या हफ्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत.
मीडिया रिपोर्ट्स मध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी 23 जानेवारी रोजी अर्थातच नेताजी सुभाष चंद्र बोस जयंतीदिनी शेतकऱ्यांना या योजनेचा तेरावा हप्ता मिळेल असं सांगितलं गेलं होतं. एवढेचं नाही तर काही ठिकाणी 26 जानेवारीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम किसान चा तेरावा हप्ता शेतकऱ्यांना देऊ करतील असं सांगितलं जात होतं.
याशिवाय एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्टमध्ये 29 जानेवारी रोजी पंतप्रधान मन की बात कार्यक्रम घेणार असून या दिवशी योजनेचा तेरावा हप्ता शेतकऱ्यांना दिला जाऊ शकतो असा अंदाज बांधला गेला होता. मात्र सद्यस्थितीला 29 जानेवारी रोजी पण या योजनेचा तेरावा हप्ता मिळणार नसल्याचे चित्र तयार होत आहे. अशा परिस्थितीस नेमका या योजनेचा तेरावा हप्ता केव्हा मिळेल हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे.
दरम्यान आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, जानेवारी महिन्यात या योजनेचा तेरावा हप्ता हा पात्र शेतकऱ्यांना दिला जाणार नसून हा हप्ता फेब्रुवारी महिन्यात दिला जाणार आहे. खरं पाहता मध्यंतरी अनेक अपात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ उचलला असल्याने या योजनेचे जे काही नियम होते ते नियम कठोर करण्यात आले आहेत.
आता या योजनेसाठी केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. याशिवाय शेतकऱ्यांना जमीन पडताळणी देखील करायला लावली जात आहे. निश्चितच या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न होत असून योग्य शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळावा असा शासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळेच या योजनेच्या तेराव्या हप्त्यासाठी उशीर होत असल्याचे सांगितले जात आहे.
शेतकऱ्यांना केवायसी करण्यासाठी, जमिनीची पडताळणी करण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध व्हावा यामुळे या योजनेचा हप्ता उशीर होत आहे. दरम्यान आता फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात या योजनेचा पुढील हप्ता हा शेतकऱ्यांना मिळणार आहे. याबाबत अजूनही केंद्र शासनाच्या माध्यमातून अधिकारीक घोषणा झालेली नाही.
मात्र, गेल्या वर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच या योजनेचा हप्ता मिळाला होता, अशा परिस्थितीत या योजनेचा 13वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना बहाल केला जाऊ शकतो असे सांगितले जात आहे.