Agriculture News : मित्रांनो 2022 खरीप हंगामात (Kharif Season) जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील सर्व विभागातील शेतकऱ्यांना (Farmer) मोठा फटका बसला आहे. शेतकरी बांधवांनी अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेल्या खरीप हंगामातील पिकांना अतिवृष्टीने बाधित केले आहे.
यामुळे शेतकरी बांधवांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवांना थोडीशी आर्थिक मदत व्हावी या अनुषंगाने मायबाप शासनाने (State Government) अतिवृष्टीग्रस्त बाधित शेतकरी बांधवांना 3500 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.
तसेच मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात गोगलगायी कीटकाचा मोठा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन समवेतचं खरीप मधील मुख्य पिकांना मोठा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत मायबाप शासनाने या तीन जिल्ह्यांसाठी 98 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.
याशिवाय आता मायबाप शासनाने अजून एक कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. राज्यातील तब्बल दहा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना (Farmer) या निर्णयाचा फायदा होणार आहे. मित्रांनो 28 सप्टेंबर रोजी झालेल्या एका मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे सरकारने (Eknath Shinde) दहा जिल्ह्यांसाठी 353 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आता हे 353 कोटी रुपये कोणत्या शेतकरी बांधवांना दिले जाणार आहेत याविषयी आज आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मित्रांनो जसे की आपणास ठाऊकचं आहे शेतकऱ्यांना पीक विमा योजनेच्या अटी आणि निकषानुसार 33 टक्के नुकसान झाले असल्यास नुकसान भरपाई (Compensation) देण्यात येते. राज्य शासनाच्या माध्यमातून जिरायत क्षेत्रासाठी 13 हजार 600 रुपये हेक्टरी मदत दिली जाणार आहे, बागायती क्षेत्रासाठी 27 हजार रुपये हेक्टरी आणि फळबाग क्षेत्रासाठी 36 हजार रुपये हेक्टरी अशी मदत दिली जाणार आहे.
मात्र, राज्य शासनाकडून दिल्या जाणाऱ्या या मदतीला राज्यातील अनेक अतिवृष्टीग्रस्त आणि बाधित शेतकरी निकष व अटीमध्ये बसत नसल्याने त्यांना या मदतीपासून वगळण्यात आले होते. या नुकसान भरपाईसाठी राज्यातील अनेक जिल्हे आणि महसूल मंडळे अपात्र करण्यात आली होती. आता राज्य शासनाने जे शेतकरी बांधव अतिवृष्टीग्रस्त असूनदेखील मदतीसाठी निकषात बसत नाही त्यांनादेखील मदत जाहीर केली आहे.
मित्रांनो, दोन दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सततच्या पावसामुळे बाधित झालेले मात्र 65 मीमी पाऊस झाला नसल्याने वगळण्यात आलेल्या शेतकरी बांधवांसाठी 755 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्यातील जवळपास सहा लाख शेतकरी बांधवांना या निधीची मदत होणार आहे. खरं पाहता ही मदत निकषात बसत नव्हते मात्र विशेष बाब म्हणून मंत्रिमंडळाने या मदतीला हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे 5 लाख 49 हजार 646 हेक्टर क्षेत्राला याचा लाभ मिळणार आहे. निश्चितचं राज्य शासनाने राज्यातील लाखों शेतकर्यांना पुन्हा एकदा दिलासा दिला आहे.