Agriculture News : शेती हा आपल्या देशातला एक मुख्य व्यवसाय आहे. देशाची निम्म्याहून अधिक जनसंख्या ही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या शेतीवर अवलंबून आहे. मात्र शेतीचा व्यवसाय हा कष्टाचा व्यवसाय आहे. पूर्वीच्या तुलनेत अलीकडे शेतीचा व्यवसाय थोडासा सोपा झाला असला तरी देखील अजूनही शेतकऱ्यांपुढे अनेक संकट कायम आहेत.
असेच एक संकट आहे विजेचे. शेतकरी बांधव सांगतात की, खरीप तथा रब्बी हंगामात विजेचा लपंडाव मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. ऐन हंगामात विजेच्या लपंडावामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो.
विशेष म्हणजे हंगामात सातत्याने लाईट जात असल्याने जर शेतकरी बांधव पिकाला पाणी देत असतील तर त्यांना जेव्हा-जेव्हा लाईट जाते तेव्हा स्टार्टरकडे जावे लागते. यामुळे शेतकऱ्यांना मोठी पायपीट करावी लागते.
जर शेतकऱ्यांची विहीर किंवा शेती पंप लांब असेल तर अशावेळी विजेचा हा लपंडाव शेतकऱ्यांच्या जीवावर येतो. मात्र शेतकऱ्यांची ही अडचण आता कायमची दूर होणार आहे.
कारण की आता शेतकऱ्यांना मोबाईल द्वारे शेतीपंपाची मोटर चालू किंवा बंद करता येणार आहे. विशेष म्हणजे मोटार कितीही लांब असली तरी देखील मोबाईल द्वारे मोटार चालू किंवा बंद होऊ शकणार आहे.
यामुळे या यंत्राचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असून यामुळे त्यांचे शेतीमधले कष्ट वाचणार आहेत. यामुळे शेतीचा व्यवसाय आणखी सोपा होण्यास मदत मिळणार आहे.
कोणते आहे यंत्र ?
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांसाठी आता संशोधकांनी सोलर आधारित फोरकास्टिंग यंत्र बनवले आहे. हे एका प्रकारे ऑटोचे पुढील वर्जन राहणार आहे.
कारण की ऑटो चालू बंद करण्यासाठी शेतकऱ्यांना ऑटोपर्यंत म्हणजे स्टार्टर पर्यंत जावे लागते. मात्र या यंत्रामुळे शेतीपंपाची मोटर मोबाईल द्वारे चालू बंद करता येणार आहे.
हे यंत्र बसवल्यास ऑटो पर्यंत जाण्याची गरज राहणार नाही. विशेष म्हणजे यामध्ये अंतराची कोणतीच मर्यादा राहणार नाही. अर्थातच तुमचे स्टार्टर कितीही लांब असले तरी देखील मोबाईलद्वारे ते चालू अथवा बंद करता येणे शक्य होणार आहे.
हरियाणा राज्यातील हिसार येथील गुरु जम्बेश्वर विज्ञान आणि प्रद्योगिकी विद्यापीठातील संशोधकांनी हे भन्नाट यंत्र विकसित केले आहे. संबंधित संशोधकांना याचे पेटंट देखील मिळालेले आहे. विशेष म्हणजे जर लाईटचा फॉल्ट झाला तर हे यंत्र याबाबत देखील शेतकऱ्यांना माहिती देणार आहे.