Agriculture News : शेतकरी बांधवांची खरी ओळख ही शेत जमिनीवरून होत असते आणि शेत जमिनीची खरी ओळख हे सातबारा उताऱ्यावरून होत असते. सातबारा उतारा हा शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेला अति महत्त्वाचा सरकारी दस्ताऐवज आहे.
हा दस्ताऐवज म्हणजे शेतजमिनीची जन्म कुंडलीच असते. सातबारा उताऱ्यावरून जमिनीची मालकी कोणाकडे आहे हे स्पष्ट होते. त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज शेतकरी बांधवांना अनेक प्रकारच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी उपयोगाचा ठरतो. एकंदरीत सातबारा हा कागद जमिन शेतकऱ्यांच्या नावावर आहे याचा पुरावा असतो.
आशा परिस्थितीत जमिनीचा खरेदी-विक्रीचा व्यवहार करण्यासाठी देखील सातबारा उतारा आवश्यक असतो. मात्र अनेकदा बनावट सातबाऱ्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते. 7/12 उतारा बनावट असल्यास जमीन खरेदी करताना शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता असते.
आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की सातबारा खरा की खोटा हे कसं ओळखता येईल. तर चिंता करू नका आज आम्ही आपल्यासाठी याबाबत महत्त्वाची माहिती घेऊन हजर झालो आहोत. आज आपण सातबारा खरा आहे की खोटा हे दोन मिनिटात कसं ओळखलं जाऊ शकतं याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
जमिनीचा सातबारा उतारा खरा आहे की खोटा दोन मिनिटात खालील पद्धतीचा वापर करून ओळखा
तलाठ्यांची स्वाक्षरीची पडताळणी करावी लागणार :– आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, सातबारा उताऱ्यावर तलाठ्यांनी सही केलेली असते. अशा परिस्थितीत जर एखाद्या सातबारा उताऱ्यावर जर तलाठ्याची सही नसेल तर समजावे की सदर सातबारा उतारा हा बोगस आहे.
युनिक कोड अन ई-महाभूमीचा लोगो पण असतो उताऱ्यावर :- सातबारा उतारा देताना अनेकदा सरकारकडून नवनवीन नियम आखले जातात. आता सरकारने केलेल्या नव्या बदलांनुसार सातबाऱ्यावर आता त्या गावाचा युनिक कोड देण्यात येतो.
यामुळे जर एखाद्या 7/12 उताऱ्यावर त्या गावाचा युनिकोन नसेल तर तो उतारा बोगस समजावा. याशिवाय आता सातबारा उताऱ्यावर महाराष्ट्र शासनाचा व ई-महाभुमी प्रकल्पाचा लोगो देखील टाकला जातो. जर एखाद्या उताऱ्यावर हा लोगो नसेल तर तो उतारा बोगस समजावा.
क्यूआर कोड पण असतो बरं :- सातबारा उताऱ्यावर आता नवीन बदलानुसार क्यूआर कोड देखील दिला जात आहे. यामुळे जर एखाद्या सातबारा उताऱ्यावर क्यूआर कोडं नसेल तर तो सातबारा उतारा बोगस समजावा. या क्यूआर कोडच्या मदतीने सातबारा उतारा बघता येतो यासाठी तो कोड स्कॅन करावा लागतो.