Agriculture News : मित्रांनो शेतकरी बांधवांना (Farmer) अनेकदा आपल्या शेतजमीन मोजणी (Land Measurement) करण्याची गरज भासत असते. जसे की पूर्व मशागत करण्यासाठी भाडे तत्वावर ट्रॅक्टर लावले असल्यास त्याला भाडे देताना नेमकी किती जमीन आहे याचा अंदाज घेण्यासाठी.
तसेच अनेकदा बी-बियाणे, खतांचा वापर करताना देखील शेत जमीन किती आहे याची माहिती शेतकऱ्यांना ठेवावी लागते. मित्रांनो मात्र आता शेतकरी बांधवांना तंत्रज्ञानाचा (Farming Technology) वापर करून काही मिनिटातच आपल्या शेतजमीनीची (Farming) मोजणी करता येणार आहे.
यासाठी शेतकरी बांधवांकडे फक्त एक अँड्रॉइड मोबाईल (Android Application) असणे आवश्यक आहे. चला तर मग मित्रांनो अँड्रॉइड मोबाईल मध्ये कशा पद्धतीने शेतजमीनीची मोजणी करता येऊ शकते याविषयी आज आपण जाणून घेऊया.
मित्रांनो शेतजमीनीची मोजणी अँड्रॉइड मोबाईल च्या माध्यमातून करायची असल्यास आपणांस प्रथम शेत जमीन मोजणीसाठी अँप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल. सध्या गुगल प्ले स्टोअरवर शेतीजमीन मोजण्याचे अनेक अँप्लिकेशन उपलब्ध आहेत.
यापैकीच एक आहे डिस्टन्स अँड एरिया मेजरमेंट अँप्लिकेशन (Distance & Area Measurement App). हे अँप्लिकेशन (Farming Application) तुम्ही तुमच्या मोबाईलचा प्ले स्टोर वरून डाऊनलोड करू शकता. मित्रांनो तुम्हाला तुमची शेत जमीन मोजायचे असेल तर तुमच्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये सर्व प्रथम गुगल प्ले स्टोर (Google Play Store) वरून Distance & Area Measurement App नावाचे मोबाईल अॅप डाउनलोड करा.
यानंतर, मोबाईलचे GPS आणि लोकेशन (GPS लोकेशन) चालू करा आणि मोबाइल अॅप चालू करा. या अँप्लिकेशनमध्ये, अंतर मोजण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध असतील म्हणजे मीटर किंवा फूट यार्ड, त्यापैकी एक निवडा.
शेतजमीन नावावर असल्यास त्या क्षेत्रासाठी एकर या पर्यायावर क्लिक करा. पुढील वेब पृष्ठावर, स्टार्ट बटण दिसले, ज्यावर क्लिक केल्यावर फील्डच्या आजूबाजूला जाईल. हे मोबाईल अँप्लिकेशन शेताच्या प्रत्येक टोकाला फिरल्यानंतर संपूर्ण जमिनीची लांबी आणि रुंदी नक्की सांगेल.
लक्षात ठेवा की या मोबाईल अॅपद्वारे शेतकऱ्यांना जमिनीचा फक्त अंदाजे अंदाज मिळतो, ज्याचा परिणाम फक्त लांबी आणि रुंदीच्या आसपास असतो. सरकारी योजना किंवा इतर कामांमध्ये जमिनीचे मोजमाप खूप उपयुक्त आहे, अशा प्रकारे हा मोबाईल एक आर्थिक साधन आहे. अशाप्रकारे शेत मोजण्यासाठी पैशांची गरज नाही, फक्त मोबाईल फोनवर जमिनीचे मोजमाप काही मिनिटांत उपलब्ध होते.