Agriculture News : शेतकऱ्यांची खरी ओळख ही शेतजमीनीवरून होत असते. आणि शेत जमिनीची ओळख ही सातबारा, 8-अ यांसारख्या कागदपत्रात कैद असते.
सातबाऱ्यावर शेतजमीन कोणाच्या नावाने आहे, त्यां जमिनीवर बोजा आहे का यांसारख्या बाबींचा उल्लेख असतो. तर 8-अ उताऱ्यावर जमीन हे किती गट क्रमांकामध्ये विभागलेली आहे याची एकत्रित माहिती असते. म्हणजेच हा 8अ उतारा किंवा खाते उतारा देखील शेतकऱ्यांसाठी अति महत्त्वाचा दस्तऐवज आहे.
आता जवळपास सर्व शासकीय कामे डिजिटल झाली आहेत, यामुळे हा उतारा ऑनलाइन पद्धतीने काढता येणे शक्य झाले आहे. अशा परिस्थितीत आज आपण हा उतारा ऑनलाइन कसा काढला जातो याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
8 अ उतारा कसा काढायचा
हा उतारा काढण्यासाठी सर्वप्रथम https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
या वेबसाईटवर गेल्यानंतर त्या ठिकाणी digital signed 7/12 या पर्यायावर क्लिक करा.
जर तुम्ही या वेबसाईटवर आधीच रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्ही युजरनेम आणि पासवर्ड वापरून साइन इन करू शकता. पण जर तुम्ही पहिल्यांदाच भेट देत असाल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे.
यासाठी न्यू युजर रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करा.
यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी विचारलेली सर्व वैयक्तिक माहिती अतिशय काळजीपूर्वक भरावी लागणार आहे.
त्या ठिकाणी विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित रित्या भरल्यानंतर तुम्हाला लॉगिन आयडी बनवायचा आहे.
यासाठी तुम्ही तुमच्या नावाचा वापर करू शकता आणि त्यामध्ये एक स्पेशल कॅरेक्टर आणि अंक वापरू शकता.
त्या ठिकाणी तुम्ही टाकलेला युजरनेम आयडी जर आधीच कोणी वापरत नसेल तर तुम्हाला पासवर्ड तयार करायचा आहे.
यानंतर त्या ठिकाणी चार पाच प्रश्न दिलेले असतात त्यापैकी एकाच उत्तर द्यायचं आहे.
यानंतर त्या ठिकाणी कॅपचा कोड प्रविष्ट करायचा आहे.
एवढ सर्व झाल्यानंतर सबमिट करायच आहे.
हे केल्यानंतर रजिस्ट्रेशन कम्प्लीट होईल. त्यानंतर तुम्हाला परत लॉगिन घ्यावे लागेल. यासाठी तुम्ही तयार केलेला युजरनेम आयडी आणि पासवर्ड प्रविष्ट करायचा आहे.
यानंतर तुमच्या पुढ्यात एक नवीन पेज ओपन होईल. या ठिकाणी Digital signed 8 A या पर्यावर क्लिक करायचा आहे.
हा डिजिटल 8अ उतारा काढण्यासाठी पंधरा रुपये शुल्क आकाराल जातो. यासाठी अकाउंट मधून पैसे कट होतात. मात्र नवीन रजिस्ट्रेशन केल असल्यामुळे तुम्हाला त्यामध्ये पैसे जमा करावे लागणार आहेत.
पैसे जमा करण्यासाठी तुम्हाला रिचार्ज अकाउंट या पर्यायावर क्लिक करायच आहे.
यानंतर तुम्हाला पंधरा रुपये रक्कम टाकायची आहे. Pay Now या बटनावर क्लिक करायचं आणि पुढे कन्फर्म म्हणायचं.
हे पैसे तुम्ही नेट बँकिंग, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड, भीम युपीआय इ. च्या माध्यमातून जमा करू शकणार आहेत.
पैसे जमा झाल्यानंतर डिजिटल 8अ च्या फॉर्मवर परत जा. त्या ठिकाणी तुमच्या खात्यात पैसे दिसतील.
यानंतर 8अ मिळवण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली सर्व माहिती व्यवस्थित रित्या भरायची आहे.
माहिती भरल्यानंतर उतारा तुमच्या पुढ्यात येईल.