Agriculture News: आजच्या या आधुनिक युगात सर्वत्र परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहे. अगदी शेती व्यवसायापासून (Farming) ते वेगवेगळ्या उद्योगधंद्यांत (Business) पर्यंत सर्वत्र परिवर्तन बघायला मिळत आहे. शेती व्यवसायाचे काळाच्या ओघात आधुनिक स्वरूप बघायला मिळत आहे.
पूर्वी देशातील शेतकरी बांधव (Farmer) पारंपारिक पद्धतीने शेती करत होते मात्र आता या यांत्रिकीकरणाच्या जमान्यात आधुनिक यंत्रांच्या सहाय्याने तसेच आधुनिक तंत्रज्ञानाने शेती शेतकरी बांधव कसत असल्याचे चित्र आहे. पूर्वी शेतकरी बांधव शेतजमिनीत शेती कसत होता मात्र अलीकडे जमिनी विना देखील शेती होऊ लागली आहे. जमिनी विना शेतकरी बांधव आता पाण्यात शेती करत आहेत.
या तंत्रज्ञानाला हायड्रोपोनिक फार्मिंग म्हणून ओळखले जाते. याशिवाय देखील शेती व्यवसायात अनेक तंत्रज्ञानाचा समावेश झाला आहे. मल्टी लेअर फार्मिंग (Multilayer Farming) हेदेखील असेच एक शेती व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञान आहे. मित्रांनो मल्टी लेअर फार्मिंग च्या माध्यमातून एकाच शेत जमिनीत तीन ते चार प्रकारची पिके घेतली जातात. यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे कमी शेतजमीन उपलब्ध असते त्या शेतकऱ्यांना मल्टी लेअर फार्मिंगचा मोठा फायदा होत असल्याचा दावा केला जातो.
जाणकार लोकांच्या मते, जमिनीच्या अगदी छोट्याशा भागात या तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केल्यास शेतकरी बांधवांना पाच लाखांपर्यंतची जंगी कमाई (Farmer Income) होणे शक्य आहे. अशा पद्धतीने या तंत्रज्ञानाचा अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचा दावा आता जोर धरू लागला आहे.
काय आहे मल्टी लेअर फार्मिंग जाणून घ्या
जाणकार लोक सांगतात की, जगभरात विशेषता आपल्या भारतात वाढती लोकसंख्या आणि कीटकनाशकांच्या अंदाधुंद वापरामुळे शेतीयोग्य जमीन कमी होत चालली आहे. आपल्या भारतात आता अल्पभूधारक शेतकरी बांधवांची सर्वाधिक संख्या आहे. अशा परिस्थितीत सेंद्रिय पद्धतीने बहुस्तरीय शेतीचे म्हणजेचं मल्टी लेअर फार्मिंगचे सूत्र अवलंबून कमी जमिनीतही शेतकरी आता लाखोंचा नफा मिळवत आहे.
शेतीच्या या पद्धतीनुसार, जमिनीच्या आत, जमिनीच्या वर, बांधावर आणि मंडप बनवून पिके घेतली जातात. अशा प्रकारे जमिनीपासून हवेपर्यँतचा शेताचा प्रत्येक भाग शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरतो, ज्याला अनेक शेतकरी बहुमजली शेतीही म्हणतात. आम्ही आपल्या माहितीसाठी इथे सांगू इच्छितो की, बहुस्तरीय शेती किंवा मल्टी लेअर फार्मिंग करून एकाच जमिनीवर 4 ते 5 प्रकारची पिके घेतली जाऊ शकतात.
अशा प्रकारे मल्टी लेअर फार्मिंग केली जाते बरं
या तंत्रज्ञानाच्या नावाप्रमाणेच, हे बहुस्तरीय शेती किंवा मल्टी लेअर फार्मिंग तंत्रज्ञान काम करत असते. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक थरांमध्ये पिके वाढवले जातात. या पद्धतीत पहिला थर जमिनीच्या आत असतो, ज्यामध्ये बटाटा, बीट, झुचीनी, आले आणि हळद यांसारखी कंदवर्गीय पिके घेतली जातात.
दुसरा थर जमिनीच्या वरचा आहे, ज्यामध्ये तृणधान्ये, फळे, फुले आणि पालेभाज्यांची रोपे लावली जातात. यामध्ये गहू-भात ते हिरव्या भाज्या, फुलांच्या रोपांची लागवड समाविष्ट आहे.
बहुस्तरीय शेतीमध्ये, तिसऱ्या थरात सावलीच्या झाडांचा समावेश होतो, ज्यामध्ये महोगनी, निलगिरी, कडुलिंब यांसारखी अनेक झाडे आणि वनस्पती तसेच फळांच्या झाडांची लागवड केली जाते.
चौथ्या थरात बेड, बांध आणि बाजूच्या मोकळ्या जागेचाही वापर केला जातो आणि बांबू, तंबू किंवा मंडपच्या साहाय्याने वेलीवर्गीय भाजीपाल्याची लागवड केली जाते.
अशाप्रकारे विविध पिकांचे चार थर कमी संसाधनात तयार केले जातात, ज्यामुळे 6 ते 8 पट अधिक नफा मिळतो.
शेतकऱ्यांसाठी फायद्याचा सौदा ठरत आहे मल्टी लेअर फार्मिंग तंत्रज्ञान
मर्यादीत जमीन असलेल्या छोट्या आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी बहुस्तरीय शेती वरदानापेक्षा कमी नाही, कारण या शेतकऱ्यांकडे फारच कमी शेतीजमीन असते, ज्यावर ते आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी कमी खर्चात शेती करू शकतात. अशा परिस्थितीत, बहुस्तरीय शेती करून, आपण आपल्या गरजेसह आपले उत्पन्न मजबूत करू शकतात.
अशाप्रकारे बहुस्तरीय शेती कमी साधनात आणि कमी वेळेत चौपट उत्पादन देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचे काम करते.
या मशागतीच्या पद्धतीत तण लागण्याची शक्यताही कमी असते, कारण कंद पिके पक्व झाल्यावर ते जमिनीतून उपटतात, त्यामुळे आपोआप तण काढण्याचे काम होते.
बहुस्तरीय शेतीमध्ये खते आणि सिंचनावर जास्त खर्च करण्याची गरज नसते, कारण चार थरांची पिके एकमेकांना पोषक तत्वांचा पुरवठा करतात. अशा प्रकारे जमीन सुपीक होते आणि भूजल पातळी राखली जाते.
केवळ सेंद्रिय खताचा वापर करून बहुस्तरीय शेतीतून बंपर उत्पादन मिळू शकते. त्यामुळे पैशांसोबतच 70 टक्क्यांपर्यंत पाण्याचीही बचत होते.
बहुस्तरीय शेती ही काही प्रमाणात सह-पीक किंवा आंतरपीक शेतीला पूरक आणि त्यापासून प्रेरित झालेली आहे, ज्यामध्ये एकाच वेळी अनेक पिके घेतली जातात.