Agriculture News: नवनवीन तंत्रज्ञान आल्याने आता भारतीय शेती (Farming) क्षेत्रात मोठी क्रांती घडून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना (Farmer) शेती करणे पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे. शिवाय यामुळे शेतकऱ्यांच्या नफ्यातही (Farmer Income) मोठी वाढ झाली आहे. असेच एक तंत्र म्हणजे बहुस्तरीय शेती (Multilayer farming) म्हणजेचं मल्टी लेअर फार्मिंग (Farming Technique) ज्याचा अवलंब करून शेतकरी अल्पावधीतच श्रीमंत होणारं आहेत.
बहुस्तरीय शेती म्हणजे काय?
एकाच वेळी आणि ठिकाणी 4 ते 5 पिके घेण्याची पद्धत म्हणजे बहुस्तरीय शेती किंवा मल्टी लेअर फार्मिंग होय. याद्वारे एकाच शेतात चार प्रकारची चार पिके घेतली जातात हे आम्ही स्पष्ट करू इच्छितो. यासाठी शेतकऱ्यांनी आधी जमिनीत असे पीक लावावे, जे जमिनीच्या आत उगवते. मग त्याच शेतात भाजीपाला आणि इतर झाडे लावता येतात. याशिवाय शेतकरी त्याच शेतात सावली आणि फळझाडे लावू शकतात.
70 टक्के पाण्याची बचत
तज्ज्ञांच्या मते, बहुस्तरीय तंत्रज्ञानाने शेती केल्यास 70 टक्के पाण्याची बचत होते. जेव्हा जमिनीत मोकळी जागा नसते तेव्हा तण नसतात. एका पिकाला जितके खत दिले जाते तितक्या खतात एकापेक्षा जास्त पीक या पद्धतीने मिळतात. पिकांना एकमेकांपासून पोषक तत्वे मिळतात. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठी बचत होते अन शेतकऱ्यांचा नफाही अनेक पटींनी वाढतो.
कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर
कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी या तंत्राने शेती करणे खूप फायदेशीर ठरू शकते. एका पिकाला पाणी देऊन शेतकरी चार प्रकारची पिके घेऊ शकतात. असे केल्याने त्यांचा लागवडीचा खर्च कमी होईल आणि त्यांना जास्त जमीन ठेवण्याची गरज भासणार नाही.
बहुस्तरीय शेतीमध्ये खर्च
बहुस्तरीय शेतीचा खर्च खूपच कमी आहे. इतर पिकांच्या तुलनेत त्याची किंमत सामान्यपेक्षा कमी आहे. तज्ज्ञांच्या मते, एका एकरात या तंत्राने शेती करण्यासाठी एका शेतकऱ्याला एक लाख रुपयांपर्यंतचा खर्च आला, तर त्यातून शेतकरी सहज 5 लाख रुपयांपर्यंतचा नफा कमवू शकतो. म्हणजे जर शेतकरी बांधवांनी या पद्धतीने शेती केली तर शेतकरी बांधवांना 25 लाखांचे उत्पन्न मिळणार आहे.