Agriculture News : शेतकऱ्यांसाठी नेहमीच वेगवेगळे संशोधन केले जातात. या संशोधनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न होत असतो. शास्त्रज्ञ नेहमीच शेतीमध्ये उपयोगी पडणाऱ्या विविध तंत्रज्ञानाचा आणि यंत्रांचा अविष्कार करतात. विविध पिकांच्या नवीन जाती विकसित करतात जेणेकरून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल.
दरम्यान शेतकऱ्यांसाठी असेच एक कौतुकास्पद संशोधन करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर येथील न्यू कॉलेजमधील इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या विद्यार्थ्यांनी शेती कामासाठी मदत करणारा एक नवीन व्हॉइस कंट्रोल रोबोट तयार केला आहे.
हा रोबोट शेतकऱ्यांना शेतीकामात मोठा हेल्पफुल ठरणार आहे. यामुळे शेतीचा व्यवसाय हा आणखी सोपा होईल अशी आशा आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की या न्यू कॉलेजमधील इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या विद्यार्थ्यांनी व्हाइस कंट्रोल अॅग्रिकल्चर रोबोट तर तयार केलाच आहे शिवाय दिव्यांग, अपंग व्यक्तींना अर्थातच फिजिकली हॅन्डिकॅप्ड पर्सन्ससाठी उपयुक्त ठरणाऱ्या स्मार्ट व्हीलचेअर सुद्धा तयार केली आहे.
यामुळे या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनामुळे त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत असून त्यांचे संशोधन अपंग व्यक्तींसाठी तथा शेतकऱ्यांसाठी विशेष फायद्याचे ठरणार असा आशावाद या निमित्ताने व्यक्त होऊ लागला आहे.
या विद्यार्थ्यांनी केलेल्या शेतकऱ्यांच्या हिताच्या आणि अपंग व्यक्तींच्या हिताच्या संशोधनाची दखल राज्य शासनाने देखील घेतली आहे. राज्य शासन आता या विद्यार्थ्यांच्या स्टार्टअपसाठी बळ देणार अशी माहिती हाती आली आहे. महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज उपक्रमाअंतर्गत या विद्यार्थ्यांना शासनाने प्रत्येकी एक लाख रुपयांचा निधी दिला आहे.
निश्चितच यामुळे या विद्यार्थ्यांना नवनवीन संशोधन करता येणार आहे आणि त्यांनी केलेल्या या संशोधनाला आणखी व्यापकता मिळणार आहे. दरम्यान आता आपण विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या दोन्ही गोष्टींची माहिती जाणून घेणार आहोत.
कसा असेल ॲग्री रोबो ?
सध्या शेतकऱ्यांपुढे वेगवेगळे आव्हान आहे. यामध्ये मजूरटंचाई हे देखील एक महत्त्वाचे आणि खूपच मोठे आव्हान आहे. पण, मजूर टंचाई दूर करण्यासाठी हे संशोधन कामी येणार आहे. बिया पेरणी, खुरपणी आणि कीटकनाशकाची फवारणी अशी कामे करण्यासाठी हा रोबोट उपयुक्त ठरणार अशी माहिती यावेळी विद्यार्थ्यांनी दिली आहे.
अपंग व्यक्तींसाठीची व्हीलचेयर कशी राहणार?
ही व्हीलचेअर दिव्यांग व्यक्तीला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेउन जाण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. यात बसल्यानंतर दिव्यांग व्यक्तीने डोके पुढे वाकवल्यानंतर ती व्हीलचेअर पुढे, तर डोके मागे वाकवल्यानंतर मागे जाणार आहे.
डाव्या बाजूला मान वाकवल्यानंतर त्या दिशेने आणि उजव्या बाजूला केल्या तर त्या बाजूला व्हीलचेअर जाणार आहे. निश्चितच या व्हीलचेअरचा दिव्यांग व्यक्तींना मोठा फायदा मिळणार आहे.