Agriculture News : मित्रांनो भारतात तसेच आपल्या महाराष्ट्रात देखील शेतकरी बांधव (Farmer) पीकपद्धतीत मोठा बदल करत आहेत. आता शेतकरी बांधव उत्पन्नवाढीचे अनुषंगाने (Farmer Income) फळबाग लागवड मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत.
फळबाग पीक आता विदेशी फळपिकांची देखील आपल्या राज्यात शेती होऊ लागली आहे. ड्रॅगन फ्रुट (Dragon Fruit Crop) या विदेशी फळाची देखील आपल्या राज्यातील शेतकरी बांधव आता मोठ्या प्रमाणात लागवड (Dragon Fruit Farming) करत असल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे ड्रॅगन फ्रुट शेतीतून शेतकऱ्यांना चांगली कमाई होत आहे. आता मायबाप शासनाने देखील ड्रॅगन फ्रुट शेतीसाठी चालना देणे हेतू एक कौतुकास्पद निर्णय (Yojana) घेतला आहे. मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारने ड्रॅगन फ्रुट शेती साठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जावे या अनुषंगाने अनुदान (Subsidy) देण्याची घोषणा केली आहे. यामुळे शेतकरी बांधवांना मोठा आर्थिक फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे.
किती मिळणार अनुदान
हाती आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सरकार ड्रॅगन फ्रुट शेती साठी शेतकरी बांधवांना अनुदान देणार आहे. मित्रांनो हेक्टरी 40 टक्के एवढे अनुदान शेतकरी बांधवांना दिले जाणार आहे. शासनाने ड्रॅगन फ्रुट लागवड साठी हेक्टरी चार लाख रुपये खर्च येत असल्याचे नमूद केले आहे.
म्हणजेच शेतकरी बांधवांना हेक्टरी एक लाख 60 हजार रुपयांचे अनुदान मिळू शकणार आहे. सदर 1 लाख 60 हजार रुपयांचे अनुदान शेतकरी बांधवांना एकूण तीन टप्प्यात दिले जाणार आहे. मित्रांनो यासाठी राज्य सरकारने चार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. विशेष म्हणजे महाडीबीटी ऑनलाइन पोर्टलवर शेतकऱ्यांची नोंदणी देखील सुरू झाली आहे.
कसं मिळणार अनुदान
मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार ड्रॅगन फ्रुट शेती साठी शेतकरी बांधवांना हेक्टरी एक लाख 60 हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. हे अनुदान शेतकरी बांधवांना एकूण तीन टप्प्यात मिळणार आहे.
या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात सात टक्के म्हणजे 96 हजार रुपयाचे अनुदान पात्र शेतकर्यांना दिले जाणार आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात 20 टक्के आणि तिसऱ्या टप्प्यात 20 टक्के या पद्धतीने अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहे.
आवश्यक कागदपत्रे आणि पात्रता
मित्रांनो मीडिया रिपोर्टनुसार, ड्रॅगन फ्रुट शेती साठी अनुदान प्राप्त करने हेतु शेतकरी बांधवांकडे 0.20 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. तसेच ज्या शेतकरी बांधवांना अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
अनुदानासाठी अर्ज करताना शेतकरी बांधवांना पासपोर्ट फोटो, सातबारा उतारा तसेच नमुना नंबर 8 अ चा उतारा, बँक खात्याचा तपशील, जातीचा दाखला, तसेच इतर आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत. मित्रांनो आम्ही या ठिकाणी नमूद करू इच्छितो की अनुदानाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्याचे बँक खाते आधारशी संलग्न असणे अनिवार्य आहे.