Agriculture News: मित्रांनो सध्या भारतातील अनेक राज्यांमध्ये जनावरांना लंपी आजार (Lumpy Skin Disease) होत आहे. हा एक जनावरांना (Animal) होणारा त्वचेशी संबंधित एक घातक आजार आहे. यामुळे दुभते जनावरे मोठ्या प्रमाणात दगावत आहेत. यामुळे पशुपालक (Animal Husbandry) शेतकरी बांधवांना (Farmer) मोठे नुकसान होत असून देशभरात पशुधनाची (Livestock) यामुळे हानी होत आहे.
भारतात लम्पी डिसीज विशेषतः राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाबमध्ये अधिक प्रमाणात बघायला मिळत आहे. आपल्या राज्यात लंपी आजाराचे जास्त जनावरे बाधित नाही. तरीदेखील अनेक ठिकाणी आपल्या राज्यातही लंपी आजाराने जनावरे बाधित झाली आहेत. या आजाराने जनावरे मोठ्या प्रमाणात दगावत असल्याने अनेक राज्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.
या रोगामुळे हजारो गायी मृत्युमुखी पडत असून, त्यामुळे गोरक्षकांमध्ये मोठ्या तणावाचे वातावरण आहे. या समस्येतून दुभत्या जनावरांची सुटका करण्यासाठी पशुपालक सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. दरम्यान, बाडमेरच्या एका पशुपालकाने आपल्या गायींना वाचवण्यासाठी लम्पी स्किन डिसीजवर घरगुती उपाय करून पाहिले, त्यानंतर गायींच्या तब्येतीत बरीच सुधारणा झाली आहे. यामुळे लंपी आजार घरगुती उपाय करून बरा होतो का? याबाबत जाणून घेण्यासाठी पशुपालक शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता बघायला मिळत आहे. यामुळे आज आपण देखील याविषयी सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
लम्पी त्वचा रोगाची लक्षणे
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बाडमेरच्या नागराम चौधरी यांच्याकडे दुधाळ गायी आहेत, ज्यांना पूर्वी लंपी ग्रासले होते. या गायींनी सुरुवातीला दूध देणे बंद केले आणि नंतर खूप ताप आल्याने गायींची भूकही संपली. या आजाराच्या उपचारासाठी नागराम चौधरी यांनी पशुवैद्यकीय रुग्णालयाशीही संपर्क साधला, मात्र त्यांच्या उपचाराचा काहीही परिणाम झाला नाही. यानंतर नागराम चौधरी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी घरीच देशी उपचार सुरू केले आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत गायींची काळजी घेण्याचा विशेष दिनक्रमही पाळला.
लंपी त्वचा रोगासाठी देसी उपाय नेमका आहे तरी कोणता…!
गायींची काळजी घेण्यासाठी नागराम चौधरी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी कडुनिंबाची पाने, तुरटीने साफसफाई करून गायींना हळद व रोटी पशुखाद्यात देण्यास सुरुवात केली.
सर्व प्रथम, पहाटे 5 वाजता गायींना चारा आणि पशुखाद्य देण्यात आले, ज्यामध्ये हळद आणि लापशी सोबत भाकरीचे तुकडे देण्यात आले.
पहिले 15 दिवस, त्यांनी माशी-डास आणि विषाणूंचा प्रादुर्भाव दूर करण्यासाठी गायींच्या भोवती आणि त्यांच्या खानावळीत कडुनिंबाची पाने टाकली.
दिवसातून तीन वेळा गाईंना तुरटीच्या पाण्याने आंघोळ घालून त्याचा स्प्रेही तयार केला जात असे.
काही दिवस हा दिनक्रम पाळल्यानंतर एकामागून एक गायींची तब्येत सुधारू लागली.
सध्या नागराम चौधरी यांच्या दोन गायींना लम्पी स्किन डिसीज झाला असून त्यांची देखभाल सुरू आहे.