Agriculture News : देशात शेती (Farming) हा एक मुख्य व्यवसाय (Farming Business) आहे. शेती व्यवसायावर देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या अवलंबून आहे. हेच कारण आहे की भारताची अर्थव्यवस्था देखील शेतीप्रधान अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते.
निम्म्याहून अधिक जनसंख्या शेतीवर अवलंबून असल्याने मायबाप शासन (Government) देखील शेतकरी हितासाठी आणि शेतीच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना (Farmer Scheme) राबवत असते. मायबाप शासन व्यतिरिक्त देशातील अग्रगण्य बँका (Bank) देखील शेती व्यवसायाला उभारी मिळावी तसेच शेतकऱ्यांचे (Farmer) जीवनमान सुधारावे यासाठी वेगवेगळ्या कर्जाच्या (Farming Loan) तसेच अनुदानाच्या (Subsidy) सुविधा वेळोवेळी राबवत असते.
मित्रांनो ग्रामीण भागात ज्या पद्धतीने शेतीवर लोक विसंबून आहेत अगदी त्याच पद्धतीने ग्रामीण भागातील शेतकरी तसेच भूमिहीन शेतमजूर शेळीपालन (Goat Rearing) या व्यवसायावर देखील अवलंबून असल्याचे चित्र आहे. शेळीपालन (Goat Farming Loan) व्यवसाय आपल्या देशात खूप लोकप्रिय होत आहे. आता शेळीपालन व्यवसाय मोठ्या स्तरावर केला जाऊ लागला आहे.
कमी खर्चात चांगला नफा मिळत असल्याने अल्पभूधारक शेतकरी बांधव तसेच ग्रामीण भागात वास्तव्यास असलेले भूमीहीन शेतमजूर या व्यवसायात अधिक रस दाखवत आहेत. मात्र, अनेकदा हा व्यवसाय सुरू करताना शेतकरी बांधवांना कमी ज्ञान आणि भांडवलाच्या अभावामुळे यश येत नाही.
पशुपालन व्यवसायात ही आव्हाने उभी राहतात
पशुपालन सुरू करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसमोर सर्वात मोठे आव्हान आहे ते भांडवलाचे असते. अल्पभूधारक शेतकरी बांधवांकडे पुरेसा पैसा उपलब्ध नसल्याने त्यांना शेळीपालन किंवा इतर पशुपालन करता येत नाही. मात्र शेतकरी बांधवांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, शेळीपालनापासून ते कुक्कुटपालनापर्यंत शेतकर्यांना बँकेकडून कर्ज मिळते.
हे बहुतांश शेतकर्यांना माहिती नसते यामुळे इच्छा असताना देखील भांडवल अभावी त्यांना पशुपालन सुरू करता येत नाही. मित्रांनो बँक फक्त कर्जत देत नाही तर आपल्या देशात अशाही अनेक बँका आहेत ज्या कर्जासोबत पशुपालन सुरू करताना विमा देखील देतात.
नाबार्ड शेतकऱ्यांना मदत करते बर
नाबार्ड अल्पभूधारक शेतकरी बांधवांना तसेच ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या भूमिहीन शेतमजुरांना विविध बँकांच्या मदतीने शेळीपालन सुरू करण्यासाठी कर्ज देते. याशिवायं राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत त्यावर अनुदानही दिले जाते. शेळीपालनासाठी अतिशय आकर्षक दरात कर्ज उपलब्ध करून देण्यात नाबार्ड आघाडीवर आहे.
या संस्थांच्या मदतीने शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते
>व्यावसायिक बँक
> प्रादेशिक ग्रामीण बँका
>राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँक
>राज्य सहकारी बँक
> अर्बन बँक
> इतर जे नाबार्डशी संबंधित आहेत
SBI देखील शेळीपालन व्यवसायासाठी कर्ज देते
मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया भारतातील सर्वात मोठी बँक आहे. ही बँक देखील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कायमच वेगवेगळ्या योजना असते. मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया देखील शेळीपालनावर कर्जाची सुविधा देते. प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पशुपालनाशी संबंधित विविध व्यवसायांसाठी कर्जही दिले जाते.
याशिवाय, SBI अर्जदाराने परिपूर्ण व्यवसाय योजना सादर केल्यावर क्षेत्र, स्थान, शेळीची जात, वापरलेली उपकरणे, खेळते भांडवल गुंतवणूक, बजेट, विपणन धोरण, श्रमशक्ती या आधारे कर्ज देखील प्रदान करते. निश्चितच शेतकरी बांधवांना शासनाकडून तसेच बँकेकडून दिल्या जाणाऱ्या या सुविधाचा लाभ घेऊन शेळीपालन व्यवसायात चांगली कमाई करता येणार आहे.