Agriculture News : गेल्या काही वर्षांपासून राज्यातील शेतकरी बांधवांना (Farmer) निसर्गाच्या लहरीपणाचा (Climate Change) मोठा फटका बसत आहे. यावर्षी देखील जुलै आणि ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली.
या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) खरीप हंगामातील (Kharif Season) सर्वच पिकांना मोठा फटका बसला होता. जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीचा पाऊस हा मराठवाड्यात सर्वाधिक बघायला मिळाला. यामुळे मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातील पिकेही पाण्याखाली गेली आहेत.
अशा परिस्थितीत शासनाने अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना मदत देखील जाहीर केली आहे. शासनाने दावा केला आहे की, एनडीआरएफच्या निकषापेक्षा अधिक निधी शासनाने (Maharashtra Government) शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे. दरम्यान आता शासनाने जाहीर केलेला निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होण्यास सुरूवात झाली आहे. मित्रांनो, नांदेड जिल्हा प्रशासनाला शासनाकडून अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना द्यावयाचा निधी प्राप्त झाला आहे.
मित्रांनो मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीच्या पावसामुळे सर्वाधिक नुकसान बघायला मिळाले. जुलै आणि ऑगस्ट मध्ये नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 27 हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र प्रभावित झालं होतं. यामध्ये पाच लाख 27 हजार 141 हेक्टर जिरायती असून सोयाबीन कपाशी ज्वारी उडीद मूग इत्यादी पिकांखालील होते. तर 314 हेक्टर क्षेत्र बागायती आणि 66 छत्र फळपिकांखालील होते. या एवढ्या मोठ्या क्षेत्राचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.
आता या एवढ्या क्षेत्रासाठी शासनाकडून जिल्हा प्रशासनाला 717 कोटी 88 लाख 91 हजार 600 रुपयांची मदत देण्यात आली आहे. हा निधी नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यातील शेतकरी बांधवांना मिळणार आहे. यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शासनाकडून आता टप्प्याटप्प्याने अतिवृष्टी बाधित जिल्हा प्रशासनाला निधी वितरित केला जाणार आहे.
निश्चितच नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेली ही मदत शेतकऱ्यांसाठी अनमोल भेट ठरणार आहे. आता राज्यातील विशेषता मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांना निधीची आतुरता लागली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार राज्यातील सर्व अतिवृष्टी बाधित जिल्ह्यांना लवकरच मंजूर झालेला निधी प्राप्त होणार आहेत. एकंदरीत या महिनाअखेर राज्यातील सर्व अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना मदत मिळू शकणार आहे.