Agriculture News : गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटांमुळे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. हवामानात सातत्याने बदल होत असल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पादन मिळत नाहीये. यामुळे देशभरातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.
एकतर पीक उत्पादित करण्यासाठी अधिकचा खर्च करावा लागत आहे आणि अशातच अपेक्षित असे उत्पादन देखील मिळत नाही. त्यामुळे शेती करणे शेतकऱ्यांसाठी दिवसेंदिवस आव्हानात्मक काम बनत चालले आहे. विशेष म्हणजे या नैसर्गिक संकटांसोबतच शेतकऱ्यांना काही अन्य अडचणी देखील भेडसावतात.
अनेकदा शेतकऱ्यांकडून त्यांच्या जमिनीचा बांध शेजारील शेतकरी कोरत असल्याच्या तक्रारी केल्या जातात. एक तर आधीच वाढत्या लोकसंख्येमुळे जमिनीचे क्षेत्रफळ दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. जमिनीचे सातत्याने विभाजन होत असल्याने आता अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या वाढलेली आहे.
अल्पभूधारक आणि अत्यल्पभूधारक शेतकरी आपल्या देशात सर्वाधिक आहेत. अशातच जर शेतकऱ्यांच्या जमिनी कोरल्या गेल्या, शेतकऱ्यांच्या जमिनीचा बांध कोरला गेला तर त्यांना निश्चितच याचा मोठा फटका बसतो.
अशा परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांकडून जर शेजारील शेतकरी शेत जमिनीचा बांध कोरत असेल तर काय ऍक्शन घेतली पाहिजे, यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमात काय तरतूद करून देण्यात आली आहे याबाबत विचारणा केली जात होती. दरम्यान आज आपण शेतकऱ्यांच्या या प्रश्नाचे उत्तर थोडक्यात जाणून घेण्याचा सविस्तर असा प्रयत्न करणार आहोत.
शेजारी शेतकरी बांध कोरत असेल तर काय कराल?
जर तुमच्या शेतजमीनीचा बांध तुमच्या शेजारी असलेले शेतकरी किंवा तुमचे भाऊबंद कोरत असतील तर तुम्ही याच्या विरोधात दिवाणी न्यायालयात जाऊ शकता. तुम्ही दिवाणी न्यायालयात या विरोधात दावा ठोकू शकता. तुम्ही दिवाणी न्यायालयात दिवाणी प्रक्रिया संहिता आदेश 7(1) व कलम 26 नुसार दावा दाखल करू शकता.
दावा दाखल केल्यानंतर दिवाणी न्यायालयात अशा प्रकरणावर सुनावणी घेतली जाते. अशा सुनावणीत मग माननीय न्यायालय सदर बांध करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करत सदर शेतकऱ्यासाठी मनाई आदेश जारी करते. एवढेच नाही तर तुम्ही माननीय न्यायालयाच्या माध्यमातून तुमच्या जमिनीची मोजणी देखील करून घेऊ शकता.