Agriculture News : यावर्षी पुन्हा एकदा पावसाचा लहरीपणा (Climate Change) शेतकऱ्याच्या (Farmer) जिव्हारी लागला आहे. पावसाच्या लहरीपणामुळे यावर्षी खरीप हंगामातील (Kharif Season) सर्वच पिकांना मोठा फटका बसला आहे.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की राज्यातील सर्वच भागात अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) खरीप हंगामातील पिके (Crop Damage) धोक्यात आली आहेत. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका मराठवाड्याला (Marathwada) बसला आहे.
अतिवृष्टीने निर्माण झालेल्या पूरसदृश्य परिस्थितीमुळे मराठवाड्यातील जवळपास साडेसात लाख हेक्टर क्षेत्रावरील खरीप हंगामातील पिकांना फटका बसला आहे. आता नुकसान ग्रस्त शेतकरी बांधवांना नव्याने सत्तेत आलेल्या शिंदे (Eknath Shinde) सरकारने एक मोठ गिफ्ट दिल आहे.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की गुरुवारी शिंदे सरकारने अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या मराठवाड्यातील शेतकरी बांधवांना नुकसानभरपाई (Compensation) देणे हेतू एक हजार 8 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्यामुळे मराठवाड्यासहित राज्यातील अतिवृष्टीमुळे आर्थिक भुर्दंड बसलेल्या सर्व शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यातील दहा लाख 9 हजार 270 शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे. या शेतकऱ्यांना येत्या सोमवारपासून नुकसान भरपाई मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. सदर शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात वर्ग केली जाणार आहे.
मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता, राज्यातील जवळपास 25 लाख 93 हजार शेतकरी अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहेत. अशा शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने 3,501 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले आहे.
मित्रांनो संपूर्ण राज्यात 23 लाख 81 हजार हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीमुळे प्रभावित झाले आहे. मित्रांनो सरकारने तीन हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचे सांगितले आहे. एवढेच नाही तर सातत्याने पाऊस कोसळत असल्यामुळे पिकांची नासाडी होत आहे यासाठी देखील शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे.
मित्रांनो मीडिया रिपोर्टनुसार, अतिवृष्टी व्यतिरिक्त सततच्या पावसाने होणारे नुकसान आणि इतर काही नैसर्गिक नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी म्हणून मराठवाडा विभागासाठी 1 हजार 596 कोटी 91 लाख 57 हजार नुकसान भरपाईसाठी निधी आवश्यक होता.
या अनुषंगाने विभागीय आयुक्तांकडून मायबाप शासनाकडे एवढ्या पैशांची मागणी देखील केली गेली होती. मात्र शासनाने एक हजार आठ कोटी रुपये एवढा निधी मराठवाड्यासाठी जारी केला आहे. एकंदरीत केवळ अतिवृष्टीची नुकसान भरपाई मराठवाड्यासहित राज्यातील शेतकऱ्यांना दिली जात आहे.
याबाबत राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी माहिती देताना सांगितले की, येत्या दोन दिवसात शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम वितरित केली जाणार आहे. महाअतिवृष्टी, अतिवृष्टी आणि गोगलगाईमुळे झालेल्या पिकांचे नुकसान लक्षात घेऊन सदरची नुकसानभरपाई दिली जाणार आहे. कृषिमंत्र्यांनी सांगितले की, मायबाप शासनाने जे निकष लावून दिले आहेत त्या आधारे संबंधित विमा कंपन्यांना लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत वितरित करण्यासंदर्भात आदेश देण्यात आले आहेत.