Agriculture News : भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशाची निम्म्याहून अधिक जनसंख्या ही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या शेती व शेतीशी निगडित उद्योगधंद्यांवर अवलंबून आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी नेहमीच वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जातात. सध्या देशातील शेतकऱ्यांसाठी शेकडो योजना सुरू आहेत.
या विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचा प्रामाणिक प्रयत्न सरकार करत आहे. याच शेकडो योजनांमध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा देखील समावेश होतो. दरम्यान आता याच योजनेसंदर्भात एक नवीन अपडेट समोर आले आहे.
या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर कधीपर्यंत जमा होणार यासंदर्भात एक नवीन माहिती हाती आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पीएम किसान सन्मान निधी योजना ही एक केंद्रीय पुरस्कृत योजना आहे.
अर्थातच या योजनेसाठी जो आवश्यक निधी आहे तो सारा निधी केंद्राकडून मंजूर होतो. या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. मात्र हे सहा हजार रुपये एकाच वेळी मिळत नाहीत.
दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण केले जात आहे. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना एकूण 17 हप्ते मिळालेले आहेत. मागील सतरावा हप्ता हा 18 जून 2024 ला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला.
दरम्यान आता या योजनेचा पुढील 18 वा हप्ता पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. खरे तर ऑक्टोबर महिन्याच्या एंडिंगला दिवाळीचा मोठा सण येणार आहे.
तसेच महिन्याच्या सुरुवातीला नवरात्र उत्सवाला सुरवात होणार आहे. दरम्यान याच सणासुदीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील सरकार पी एम किसान सन्माननिधी योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच 18 वा हप्ता दसऱ्याच्या आधीच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची शक्यता आहे.
म्हणजेच पुढील महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या योजनेचा अठरावा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र या संदर्भात अजून कोणतीच अधिकृत माहिती हाती आलेली नाही.
केंद्रातील मोदी सरकारने अनेकदा सणासुदीच्या आधीच या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. यामुळे यंदाही विजयादशमीच्या आधीच म्हणजेच दसऱ्याच्या आधीच या योजनेचा पुढील 18 वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो अशी दाट शक्यता आहे.