Agriculture News : सातबारा हा शेत जमिनीचा आरसा आहे. यावर शेतकऱ्याकडे किती शेत जमीन आहे याची माहिती नमूद असते. मात्र अनेकदा शेतकरी बांधवांना अशी शंका असते की आपल्या सातबाऱ्यावर जेवढी जमीन नमूद आहे तेवढी जमीन प्रत्यक्षात नाही. म्हणजेच आपल्या जमिनीवर शेजाऱ्याने अतिक्रमण केले आहे असा अनेकदा शेतकऱ्यांना संशय असतो.
त्यामुळे शेजारी असलेल्या शेतकऱ्यांसोबत वैमनस्य तयार होते. अनेकदा भानगडी देखील होतात. कोर्ट कचेरी पर्यंत हे प्रकरण जात. मात्र यावर एक उपाय म्हणजे शेत जमिनीची मोजणी. आता शेत जमिनीची मोजणी कशी करायची? यासाठी अर्ज कसा करायचा? या सर्व गोष्टींची माहिती शेतकऱ्यांना नसते.
यामुळे आज आपण शासकीय शेतजमीन मोजणीसाठी अर्ज कसा करायचा, महत्त्वाचं म्हणजे अर्ज भरायचा कसा? याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग क्षणाचा ही विलंब न करता जाणून घेऊया याविषयी.
जमीन मोजणी करण्यासाठी अर्ज कसा करायचा
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, शेतजमीन मोजणी करण्यासाठी शेतकऱ्यांना भूमी अभिलेख विभागाच्या तालुकास्तरावरील उपअधीक्षक भूमी अभिलेख किंवा नगर भूमापन अधिकारी यांना अर्ज करावा लागतो.
शेतकरी बांधव अर्जाचा नमुना bhumiabhilekh.maharashtra.gov.in शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरून डाऊनलोड करू शकणार आहेत.
अर्जाचा नमुना डाऊनलोड केल्यानंतर शेतकरी बांधवांना हा नमुना अतिशय काळजीपूर्वक भरावा लागणार आहे.
अर्ज भरताना सुरुवातीला ज्या ठिकाणी तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे तो तालुका नमूद करायचा. तसेच जिल्ह्याचे नाव टाकायचं.त्यानंतर अर्जदाराचे संपूर्ण नाव आणि पत्ता प्रविष्ट करायचा आहे.
यानंतर मोजणी करण्यासंबंधीची माहिती आणि मोजणी प्रकाराचा तपशील देखील त्या ठिकाणी नमूद करावा लागेल. यामधील मोजणीच्या प्रकारासमोर मोजणीचा कालावधी आणि उद्देश नमूद करायचा. मोजणीचा कालावधी म्हणजे किती महिन्यात जमिनीची मोजणी करायची आहे हे शेतकऱ्याला इथं नमूद करायचा आहे. तसेच उद्देश म्हणून शेतकऱ्यांना शेतजमीन नेमकी मोजणी का बर करायचे जसे की कुणी बांधावर अतिक्रमण केल आहे म्हणून, स्वतःच्या शेत जमिनीची हद्द जाणून घ्यायची आहे म्हणून. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायचा की मोजणीच्या कालावधीवर आणि शेत जमिनीच्या क्षेत्रावर संबंधित शेतकऱ्यांना मोजणीसाठी आवश्यक शुल्क भरावे लागणार आहे. (या शुल्काबाबत आपण पुढे जाणून घेणारचं आहोत) आता पुढे अर्जदार शेतकऱ्याला तालुक्याचे नाव गावाचं नाव आणि शेत जमिनीचा गट क्रमांक प्रविष्ट करावा लागेल.
आता सरकारी खजिनात भरलेली मोजणी फीची रक्कम. यासमोर मोजणीसाठी जी फी दिली आहे किंवा शुल्क दिले आहे त्याची माहिती तिथे नमूद करायची आहे. यासाठीचा चलन किंवा पावती क्रमांक नमूद केला जातो.
आता सर्वात मोठा प्रश्न मोजणीसाठी शुल्क किती आकारला जातो. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की हे सर्वस्वी मी मोजणीचा कालावधी आणि किती क्षेत्र मोजायचा आहे यावर डिपेंड असतं. यामध्ये अतिआतडीची मोजणी ही दोन महिन्यात होते, तातडीची मोजणी ही तीन महिन्यात आणि साधी मोजणी ही सहा महिन्यात होते. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, एक एकर शेत जमिनीसाठी साधी मोजणी करायची असेल तर एक हजार रुपये तातडीच्या मोजणीसाठी 2000 आणि अति तातडीच्या मोजणीसाठी 3000 एवढा शुल्क आकारला जातो. ( या ठिकाणी शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आम्ही येथे शुल्क बाबत दिलेली ही माहिती तंतोतंत खरी ठरेल असं नाही यामध्ये शासनकडून वारंवार बदल देखील केले जाऊ शकतात. यामुळे याची अचूक माहिती जाणून घेण्यासाठी संबंधित प्राधिकरणाकडे जाऊन शेतकऱ्यांनी माहिती घेणे अपरिहार्य राहणार आहे.)
यानंतर शेतकरी बांधवांना सातबारा उतारा प्रमाणे जमिनीचे सहधारक या पर्यायात जर सातबारा हा एकापेक्षा अधिक व्यक्तींच्या नावे असेल तर त्या सर्वांची संमती आणि त्या ठिकाणी त्यांच्या सह्या घ्याव्या लागणार आहेत.
यानंतर लगतच्या कब्जेदार यांची नावे आणि पत्ता यामध्ये ज्या शेतजमिनीची मोजणी करायची आहे त्याच्या आजूबाजूच्या चारी दिशाला असलेल्या शेतकऱ्यांची नावे आणि पत्ता नमूद करायचा आहे.
त्यानंतर अर्जाच्या खाली आवश्यक कागदपत्रांची यादी देण्यात आली आहे. मोजणीचा अर्ज, मोजणी फीचीं पावती, तसेच तीन महिन्याच्या आतील सातबारा यांसारखी कागदपत्रे अर्जासोबत द्यायचे आहेत.
अर्ज व्यवस्थेतरित्या भरल्यानंतर आणि कागदपत्र जोडल्यानंतर संबंधित अर्ज कार्यालयात जमा करायचा आहे.
अर्ज जमा झाला की ऑफिसमध्ये हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने इ-मोजणी प्रणालीवर दाखल केला जातो. यानंतर पत्रे तपासले जातात मोजणीसाठी आवश्यक फी किती लागणार हे निश्चित केला जात. नंतर फी साठी एक चलन दिल जात. जे की शेतकरी बांधव बँकेत जाऊन भरू शकतात.
यानंतर नोंदणी क्रमांक मिळतो. नंतर मोजणीची पोच दिली जात. यांमध्ये मोजणी केव्हा होईल कोणता अधिकारी येईल त्याचा फोन नंबर यांसारख्या बाबी नमूद असतात.