Agriculture News: मित्रांनो मान्सूनच्या (Monsoon) दुसऱ्या चरणात पावसाचा (Rain) प्रकोप पाहायला मिळतं आहे. अनेक राज्यांमध्ये पावसाची (monsoon rain) संततधार सुरू असून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
यामध्ये आसाम, कर्नाटक, तेलंगणा आणि आपल्या महाराष्ट्राचा देखील समावेश आहे. आपल्या राज्यात पावसाची तीव्रता अधिक पाहायला मिळत आहे. आपल्या राज्यातील शेकडो एकरावरील पिके (Crop Damage) पाण्याखाली गेले आहेत.
अनेक राज्यांमध्ये हजारो एकर पिकांचे नुकसान झाले आहे. शिवाय राज्यातील प्रमुख धरणे शंभर टक्के क्षमतेने भरली असल्याने धरणातून आता नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अशा परिस्थितीत नदीकाठी वसलेल्या गावांमध्ये पाऊस शिरकाव करत असून शेतात पाणी साचत आहे. त्यामुळे आपल्या राज्यातील शेकडो गावातील खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान होत आहे.
अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान होऊ शकते
जाणकार लोकांच्या मते, खरीप पिकांसाठी (kharif crop) पाऊस खूप फायदेशीर असतो. मात्र असे असले तरी जर शेतात जास्त पाणी साचले आणि पाण्याचा निचरा झाला नाही तर पिके कुजतात. एवढेच नाही तर पावसाची उघडीप राहिले नाही तर सूर्यप्रकाश पिकांना मिळत नाही यामुळे पिकांची वाढ खुंटते.
याशिवाय पिकांमध्ये पावसामुळे विविध प्रकारच्या कीटकांचे तसेच रोगांचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते. जाणकार लोक सांगतात की, अतिवृष्टीमुळे भाजीपाला आणि कडधान्य पिकांवर खूपचं वाईट परिणाम होत आहे. म्हणूनच आता शेतकरी बांधवांना योग्य पीक व्यवस्थापनाचा (Crop Management) अवलंब करावा लागणार आहे. जेणेकरून नुकसान कमी करता येईल आणि शेतकऱ्यांना वाचलेल्या पिकातून चांगली कमाई (farmer income) होईल.
पावसाच्या पाण्याचा असा बंदोबस्त करावा लागेल
जाणकार लोक शेतकरी बांधवांना (farmer) जर शेतात पाणी साचले असेल तर शेतातून पाणी बाहेर काढण्यासाठी पर्याप्त व्यवस्था करण्याचा सल्ला देतात. ज्या शेतात पिके लावली आहेत, त्याठिकाणी पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था चांगली करावी असा सल्ला शेतकरी बांधवांना दिला जातो. जाणकार लोकांच्या मते, शेतात पाणी साचले नाही तर पिके कुजण्याची आणि सडण्याची शक्यता कमी होते आणि रोग देखील कमी येतात. म्हणजे रोगाचा प्रादुर्भाव जर झाला नाही तर शेतकऱ्यांच्या उत्पादनातही वाढ होणार आहे.
खोल असलेल्या जमिनीत शेती करू नका
खोल जमीन असल्याने शेतात पाणी तुंबण्याची शक्यता वाढते. अशावेळी पिकांचे नुकसान होते. त्यामुळे उत्पादनातही घट होते. असा त्रास टाळण्यासाठी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना शेतात उंच बेड्स करून शेती न करण्याचा सल्ला दिला आहे. असे केल्याने शेतात पाणी साचत नाही.
शेतात नाले बनवा
जर अनेक दिवसांपासून सतत पाऊस पडत असेल तर पीक खराब होण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी शेतातील बांध कापून ठीक-ठिकाणी नाले काढून ठेवावे. यामुळे शेतात साचलेलं सर्व पाणी नाल्यातून बाहेर पडेल. त्यामुळे शेतात पाणी साचणार नाही आणि मुसळधार पाऊस झाला तरी पिके वाचू शकतात.