Agriculture News : बैल हा शेतकऱ्याचा (Farmer) खरा सोबती असतो. अशाच एका शेतकऱ्याच्या सोबती बैलाचा सध्या देशात चांगलाच धुमाकूळ पाहायला मिळतं आहे. कर्नाटकातील हावेरी येथील ब्रह्मा बैल (Brahma Bull) सध्या सर्व्याच्या डोळ्यांचे पारणें फेडत आहे.
हा आठ वर्षांचा ब्रम्हा बैल सध्या चर्चेत (Viral Bull News) आला आहे. यामागे कारण देखील तसेच रंजक आहे. खरं पाहता, हा बैल चर्चेत येण्यामागे त्याची महागडी किंमत (Expensive Bull) कारण बनले आहे. हा बैल त्याच्या मालकाने तीन वर्षांपूर्वी एक लाख 25 हजारांना विकत घेतला होता.
आता तीन वर्षानंतर ब्रम्हाच्या मालकाने तो बैल विकला असून त्याला आता तब्बल 19 लाख (19 Lac Bull) रुपये मिळाले आहेत. बैल खरेदीसाठी दिलेले हे एवढे मोठे पेमेंट बघता हा बैल बैलप्रेमीच्या मध्यात चांगलाच चर्चेचा ठरत आहे.
मित्रांनो ब्रम्हा बैलांच्या शर्यतीत नेहमीचं अव्वल राहतो हेच कारण आहे की ब्रम्हा बैलाला एवढी मोठी किंमत मिळाली आहे. ब्रम्हा बैलाबद्दल असे म्हटले जाते की, तो प्रत्येक शर्यतीत नवीन जोमाने आणि वेगाने धावतो. ब्रह्मा बैलाला बैलांच्या शर्यतीतला उसेन बोल्ट म्हणून ओळखले जात आहे.
19 लाखांना विकला गेला ब्रम्हा बैल
ब्रह्माला त्यांचे मालक मलेशप्पा यांनी तीन वर्षांपूर्वी एक लाख 25 हजार रुपयांना विकत घेतले होते. आता त्याचे मालक मलेशप्पा यांनी ब्रम्हा बैलाला तब्बल 19 लाख रुपयांना विकले आहे. तामिळनाडूतील नवीन नावाच्या शेतकरी बांधवाने हा बैल खरेदी केला असून ब्रम्हा बैलाला आता त्याचा नवीन मालक मिळाला आहे. त्याच्या मालकाच्या मते, बैलासाठी दिलेली ही सर्वाधिक किंमत आहे.
अनेक पुरस्कारांसह WonCash बक्षीस
मलेशप्पाच्या आयुष्यात जेव्हा ब्रम्हा बैल आले तेव्हापासून त्यांचे जीवन स्वर्गमय झाले असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. ब्रह्मा बैल मलेशप्पासाठी भाग्यवान ठरला आहे. ब्रम्हा बैलाने अनेक रोख पारितोषिकासह वेगवेगळे पुरस्कार देखील आपल्या नावावर केले आहेत. विक्रीचे कारण विचारल्यावर मलेशप्पा सांगतात की, मी पैशासाठी ब्रह्मा विकत नाही, परंतु त्यांनी या प्रश्नाचे कोणतेही योग्य उत्तर दिले नाही.
गावातील लोक खूश नाहीत
मलेशप्पा यांच्या या निर्णयावर गावातील लोक खूश नाहीत. कारण संपूर्ण गाव ब्रह्मदेवाच्या गतीचा चाहता आहे. कर्नाटकात बैलांच्या शर्यतीत ब्रम्हा बैल खूपच लोकप्रिय होता, आणि आता तामिळनाडूमध्ये ब्रम्हा आपली पॉवर दाखवण्यासाठी गेला असल्याचे बोलले जात आहे.