Agriculture News : भारत हा कृषिप्रधान देश असून देशाच्या अर्थव्यवस्थेचा बळीराजा हा कणा आहे. अशा परिस्थितीत देशातील शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाकडून वेगवेगळ्या योजना कार्यान्वित केल्या जातात. शेतकऱ्यांना शेती करताना सोयीचे व्हावे या अनुषंगाने त्यांना प्रोत्साहन देखील दिले जाते.
दरम्यान आता महाराष्ट्र राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना आता पंधरा हजाराचा अनुदान देण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयाच्या माध्यमातून आता राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 15 हजाराच अनुदान मिळणार आहे. या संदर्भातील निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. निश्चितच या निर्णयामुळे राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष बाब म्हणजे या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेसाठी 1000 कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चास मान्यता देखील देण्यात आली आहे.
एका आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात एकूण पाच लाखाहून अधिक शेतकरी बांधव हे धानाची म्हणजे भाताची शेती करतात, मात्र हमीभाव केंद्रावर पाच लाख शेतकऱ्यांनी त्याची नोंदणी केली आहे अशा परिस्थितीत या निर्णयाचा थेट पाच लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
कोणत्या धान उत्पादकांना मिळणार हा लाभ?
वास्तविक पाहता डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 15000 रुपये प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात याचा अंमलबजावणीसाठी आवश्यक खर्चासाठी मान्यता मंगळवारच्या बैठकीत देण्यात आली आहे.
यामुळे आता नोंदणीकृत धान उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान दिल जाणार आहे. विशेष म्हणजे हे अनुदान दोन हेक्टर क्षेत्राच्या मर्यादित राहणार आहे. पाच लाख शेतकरी बांधवांनी 2022-23 मध्ये नोंदणी केली असून सहा लाख हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर धानाची लागवड झाली आहे.
गेल्यावर्षी मिळाली नव्हती प्रोत्साहन रक्कम
वास्तविक धान उत्पादकांना दरवर्षी प्रोत्साहन रक्कम दिली जाते. मात्र गेल्यावर्षी धान उत्पादकांना प्रोत्साहनाची रक्कम देण्यात आली नव्हती. आम्ही आपणास सांगू इच्छितो की यंदा धान उत्पादकांना प्रतिहेक्टरी अनुदान दिल जाणार आहे. यापूर्वी मात्र प्रतिक्विंटल सातशे रुपये इतक अनुदान शेतकऱ्यांना मिळत होतं. यंदा मात्र यामध्ये मूल आग्रह बदल घडवून आणला आणि आता प्रोत्साहानाची रक्कम हेक्टरी प्रमाणे मिळणार आहे.