Agriculture News : दुष्काळ, अवकाळी, अतिवृष्टी या साऱ्या नैसर्गिक संकटांमुळे अन शेतमालाला अपेक्षित असा भाव मिळत नसल्याने बेजार झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ही बातमी राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी अधिक खास राहणार आहे. वास्तविक धान अर्थातच भात हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे.
याची लागवड पावसाळ्यात अर्थातच खरीप हंगामात केली जाते. राज्यातील विदर्भ विभाग हा धान उत्पादनासाठी अर्थातच भात उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. दरम्यान विदर्भातील भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे.
जस की आपणास ठाऊकच आहे की गेल्या वर्षी झालेल्या हिवाळी अधिवेशनात शिंदे सरकारने राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000 रुपये एवढे बोनस देण्याचे जाहीर केले होते. दोन हेक्टरच्या मर्यादेत बोनसची ही रक्कम शेतकऱ्यांना दिली जाणार आहे.
म्हणजे एका शेतकऱ्याला कमाल चाळीस हजार रुपयांपर्यंतचा बोनस मिळणार आहे. दरम्यान याच संदर्भात आता एक मोठी माहिती समोर आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार गोंदिया या प्रमुख धान उत्पादक जिल्ह्यांमधील पात्र धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनसची रक्कम मिळाली आहे.
ज्या धान उत्पादक शेतकऱ्यांनी शासनाच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी केलेली होती त्यांना ही बोनसची रक्कम वितरित करण्यात आली आहे. खरेतर या बोनससाठी गोंदिया जिल्ह्यातील १ लाख २२ हजार ८१४ शेतकरी पात्र ठरले आहेत. दरम्यान याच पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना आता प्रोत्साहन अनुदान अर्थातच बोनस वितरित केला जात आहे.
आतापर्यंत या जिल्ह्यातील पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांपैकी १ लाख २० हजार ८५५ शेतकऱ्यांना बोनस चा पैसा मिळाला आहे. या संबंधित पात्र शेतकऱ्यांच्या बैंक खात्यावर बोनसचे २३५ कोटी ७६ लाख रुपये जमा करण्यात आली असल्याची माहिती एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.
मागील वर्षी राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 15000 रुपये आणि 2 हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत बोनस वितरित करण्यात आला होता. यंदा मात्र बोनसची रक्कम 5000 रुपयांनी वाढवली गेली आहे.
राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 20000 रुपये एवढी रक्कम बोनस स्वरूपात दिली जात आहे. यासाठी गोंदिया जिल्ह्याकरिता २३९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान यापैकी 235 कोटी 76 लाख रुपये एवढी रक्कम पात्र ठरलेल्या १ लाख २० हजार ८५५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग सुद्धा झाली आहे.
तसेच उर्वरित १९५९ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर देखील लवकरच बोनाची रक्कम जमा केली जाणार आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असे बोलले जात आहे.