Agriculture News: भारतीय कृषी शास्त्रज्ञ (Agricultural Scientists) वर्षानुवर्ष भारतीय शेतीत सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. कृषी शास्त्रज्ञ शेतकऱ्यांना चांगले उत्पादन (Farmer Income) घेता यावे यासाठी वेगवेगळ्या पिकांचा वेगवेगळ्या सुधारित जातींची (Crop Variety) निर्मिती करत असतात. शिवाय शेतकरी बांधवांना (Farmer) आधुनिक पद्धतीने शेती करता यावी यासाठी कृषी शास्त्रज्ञ वेगवेगळ्या यंत्राची उभारनी देखील करत असतात.
आता हिमाचल प्रदेश मधील कृषी शास्त्रज्ञांनी शेतीमध्ये एक क्रांती घडवून आणली असून एका भन्नाट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जमिनीविना शेती (Farming) करून दाखवली आहे. नौनी विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राने (KVK) प्रथमच मातीचा वापर न करता पाण्यात चेरी टोमॅटोची लागवड (Cherry Tomato Farming) करण्यात यश मिळवले आहे.
नौनी विद्यापीठाला दोन वर्षांनंतर जलप्रवाह तंत्रज्ञान (हायड्रोपोनिक) या चाचणीत यश मिळाले आहे. तडका मारण्याशिवाय, चेरी टोमॅटो सॅलड म्हणून देखील खाल्ले जातात. यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. कोविड, ताप, सर्दी या रुग्णांसाठी हे टोमॅटो फायदेशीर ठरते.
नौनी विद्यापीठाने हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाचा (Hydroponic Technique) वापर करून एका भांड्यात चेरी टोमॅटोचे विविध प्रकार तयार केले आहेत. पूर्वी टोमॅटो शेतात/जमिनीत लावले जात होते. मात्र आता प्रथमच ते पाण्यात तयार करण्यात आले आहे. केव्हीकेतर्फे गेल्या दोन वर्षांपासून यावर संशोधन सुरू होते. पूर्वी कोबी आणि पालक या तंत्राने तयार केले जात होते. यशस्वी संशोधनानंतर आता त्याचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना दिले जाणार आहे.
हायड्रोपोनिक तंत्राने पॉलिहाऊस, स्वयंपाकघर, भिंत किंवा कोणत्याही खोलीत प्लास्टिकच्या भांड्यांमध्ये विशेष आकाराच्या पाईपची जाळी तयार करून एकदाच पाणी ओतले जाते. हे पाणी सुमारे 15 मिनिटे फिरत राहते. या पाण्यात ते पोषक घटक मिसळले जातात, जे जमिनीत असतात.
हायड्रोपोनिकपासून चेरी टोमॅटो रोगाशिवाय वाढू शकतात. हवामानातील बदल, कठीण भौगोलिक परिस्थिती आणि सिंचनाचा अभाव अशा प्रदेशात हे तंत्र सर्वाधिक फायदेशीर ठरणार आहे. हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाने चेरी टोमॅटो तयार करण्यासाठी प्रथमच यशस्वी प्रशिक्षण देण्यात आले आहे.
यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. आता पुढील वर्षापर्यंत याचे प्रशिक्षणही शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नफा मिळू शकेल. वनस्पतींना मातीपासून होणारे रोग देखील कमी होतील. असे डॉ.सीमा ठाकूर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ, KVK सोलन यांनी सांगितले आहे.