Agriculture News : भारतात जून ते सप्टेंबर हा चार महिन्यांचा काळ मानसूनचा असतो. या चार महिन्यांच्या काळात पडणाऱ्या पावसावरच शेतीचे भवितव्य अवलंबून असते. दरम्यान पावसाळ्यातील चार महिन्यांपैकी तीन महिन्यांचा काळ उलटला आहे. जून, जुलै आणि ऑगस्ट हा तीन महिन्यांचा पावसाळी काळ संपला आहे.
परंतु या तीन महिन्यांपैकी केवळ जुलै या एकाच महिन्यात राज्यात समाधानकारक असा पाऊस पडला आहे. विशेष बाब अशी की जून महिन्यातही काही भागात चांगला पाऊस झालेला नाही. मात्र जुलै महिन्यात राज्यातील बहुतांशी भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली होती.
जून आणि ऑगस्ट महिन्यात मात्र सरासरी पेक्षा खूपच कमी पाऊस पडला आहे. ऑगस्ट महिन्यात तर आत्तापर्यंत केवळ 40 टक्के पावसाची नोंद झाली आहे. म्हणजे जवळपास 60 टक्के पावसाची तूट आहे. अशा परिस्थितीत, सध्या खरीप हंगामातील पिके संकटात आली असून काही भागातील पिके करपून गेली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
एकूणच महाराष्ट्र जवळपास दुष्काळाच्या छायेत आला आहे. त्यामुळे दुष्काळाच्या छायेत असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यासाठी महत्त्वाचे निर्देश निर्गमित केले आहेत.
खरंतर, राज्य शासनाकडून या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पीएम किसान योजनेच्या धर्तीवर नमो किसान योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या नमो शेतकरी योजनेअंतर्गत पी एम किसान प्रमाणेच 6,000 रुपयाचा लाभ दिला जाणार आहे. या योजनेअंतर्गत दोन हजाराचा एक हप्ता याप्रमाणे लाभ दिला जाणार आहे. अर्थातच आता राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसानचे सहा हजार आणि नमो शेतकरीचे 6,000 असे एकूण 12 हजार रुपये मिळणार आहेत.
विशेष बाब अशी की, नमो शेतकरी साठी पीएम किसान योजनेचेच पात्र शेतकरी पात्र राहणार आहेत. खरंतर नमो शेतकरीचा पहिला हप्ता हा पीएम किसानच्या 14व्या हफ्त्यासोबतच वितरित करण्याचे नियोजन आखण्यात आले होते. मात्र तसं काही झाल नाही. अजूनही नमो शेतकरी चा पहिला हप्ता शेतकऱ्यांना मिळालेला नाही.
पण आता कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांचे हित लक्ष्यात घेऊन हा पहिला हप्ता लवकरात लवकर जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत मुंडे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, पावसाळी अधिवेशनात या योजनेसाठी 4000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या 4 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
यातून या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता दिला जाणार आहे. तसेच पीएम किसान योजनेच्या लाभापासून तांत्रिक अडचणीमुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना देखील नमो शेतकरी योजनेत समाविष्ट करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न युक्त पातळीवर करण्याचे निर्देश यावेळी मुंडे यांनी संबंधितांना दिले आहेत. दरम्यान, या योजनेच्या नदीचे वितरण पीएफएमएस प्रणालीतून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात केले जाणार आहे.
यामुळे या योजनेची या प्रणालीत नोंदणी करण्यात आली आहे. तसेच या योजनेचे मॉडेल महाडीबीटी पोर्टलवर विकसित करण्याचे काम सध्या महा आयटी कडून युद्ध पातळीवर सुरू आहे. एकूणच काय की, या योजनेचा पहिला हप्ता राज्यातील पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावा यासाठी मुंडे यांनी संबंधितांना आदेश निर्गमित केले आहेत. यामुळे आता दुष्काळाच्या उंबरठ्यावर आलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.