Agriculture News : राज्यातील तमाम शेतकऱ्यांसाठी (Maharashtra Farmer) एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो, राज्यात अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) ज्या शेतकरी बांधवांचे नुकसान झाले आहे अशा शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की राज्यात जून ते ऑगस्ट या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी सदृश्य पाऊस (Maharashtra Rain) झाला. यामुळे राज्यातील अनेक भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.
त्यावेळी राज्यात पुराची परिस्थिती निर्माण झाल्याने खरीप हंगामातील (Kharif Season) पिकांना मोठा फटका बसला होता. शेतकरी बांधवांनी (farmer) अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेल्या खरीप हंगामातील पिकांना (Kharif Crops) अतिवृष्टीमुळे मोठा फटका बसला आणि खरीप हंगामातील सर्व पिके जवळपास क्षतीग्रस्त झाली.
आता अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवांना नव्याने सत्तेत आलेल्या मुख्य मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मदतीची घोषणा केली आहे. मित्रांनो राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवांना शिंदे सरकारने तीन हजार 501 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. याबाबत आता राज्याचे कृषी मंत्री (Minister Of Agriculture) अब्दुल सत्तार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
अब्दुल सत्तार यांच्या मते, राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवांना सोमवारपासून नुकसानभरपाईची रक्कम मिळण्यास सुरुवात होणार आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की नुकसान भरपाईची रक्कम ही थेट अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा होणार आहे यामुळे शेतकरी बांधवांची मोठी चिंता मिटणार आहे.
दरम्यान, आम्ही ठिकाणी नमूद करू इच्छितो की, जुलैमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मात्र असले तरी आतापर्यंत अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवांना एक छदाम देखील मायबाप शासनाने हाणून मारला नाही. मात्र आता राज्याच्या कृषी मंत्र्यांनी थेट नुकसान भरपाई जमा होण्याची तारीखचं डिक्लेअर केली असल्याने शेतकऱ्यांमध्ये कमालीचे समाधानाचे वातावरण पाहायला मिळते.
आता अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवांना सोमवारपासून नुकसानभरपाईची रक्कम मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. जून ते ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील जवळपास सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर मायबाप शासनाकडून आवश्यक ती प्रक्रिया करण्यात आले आहे.
अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करून, पंचनामे करून आता शेतकरी बांधवांना नुकसान भरपाईची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, राज्यातील तब्बल 25 लाख 93 हजार शेतकऱ्यांसाठी 3 हजार 501 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
यामध्ये 23 लाख 81 हजार हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले होते. त्याचबरोबर एका शेतकऱ्यास 3 हेक्टरपर्यंतची नुकसानभरपाई दिली जाणार आहे. निश्चितच सोमवारपासून नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये सर्वत्र समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.