Agriculture News : महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये धानाची अर्थातच तांदळाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. तांदळाची लागवड आपल्या राज्यात विदर्भ आणि कोकण विभागात मोठ्या प्रमाणात होते. राज्यातील विदर्भ आणि कोकणातील शेतकऱ्यांचे तांदूळ हे एक अतिशय महत्त्वाचे अन्नधान्य पीक आहे.
धानाच्या लागवडीवर राज्यातील विदर्भ आणि कोकणातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. धान हे खरीप हंगामात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे.
दरम्यान, धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी शास्त्रज्ञांनी एक नवीन वाण विकसित केले आहे.
भारतीय कृषी शास्त्रज्ञांच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे यासाठी नेहमीच वेगवेगळे संशोधन केले जाते. या संशोधनातून विविध पिकाच्या नवनवीन जाती विकसित केल्या जात आहेत. शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळावे यासाठी कृषी शास्त्रज्ञ नवनवीन जाती विकसित करतात.
अशातच आता पुदुच्चेरी येथील कराईकलच्या कृषी विद्यापीठाने धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी असेच एक नवीन वाण विकसित केले असल्याचे वृत्त समोर आले आहे. या नव्याने विकसित झालेल्या धानाच्या जातीमधून शेतकऱ्यांना चांगले दर्जेदार उत्पादन या ठिकाणी मिळू शकणार आहे.
शास्त्रज्ञांनी धानाचे कोणते नवीन वाण विकसित केले
केकेएल (आर) असे या नवीन वाणाचे नाव आहे. शास्त्रज्ञांनी हे नवीन वाण खारपट जमीन आणि सामान्य जमीन अशा दोन्ही जमिनीत चांगले उत्पादन देण्यास सक्षम राहणार असा दावा केला आहे. धानाची लागवड खारपट जमिनीत केली तर उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते.
दरम्यान शास्त्रज्ञांनी हीच गोष्ट डोळ्यापुढे ठेवून धानाचे हे नवीन वाण तयार केले आहे. या नव्याने विकसित झालेल्या तांदळाच्या जातीपासून शेतकऱ्यांना खारपट जमिनीतून देखील चांगले उत्पादन मिळू शकणार आहे.
देशात क्षारपड जमिनी किंवा खारपटपणा असलेल्या जमिनी मोठ्या प्रमाणात आढळतात. जर या अशा जमिनीत सध्या स्थितीला बाजारात असलेल्या धानाच्या जातीची लागवड केली तर शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळत नाही.
यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. परंतु ही नव्याने विकसित झालेली जात क्षारपड जमिनीत आणि खारटपणा असलेल्या जमिनीत देखील चांगले उत्पादन देणार आहे.
दरम्यान कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून लवकरच हे नवीन वाण शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामुळे भविष्यात धान उत्पादक शेतकऱ्यांना खारपट जमिनीत देखील धानाची लागवड करता येणे शक्य होणार आहे.