Agriculture News : मित्रांनो, नवोदित शिंदे सरकारने (Eknath Shinde) ठाकरे सरकारचा नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान (Subsidy) म्हणून 50 हजार रुपये देऊ करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. आता या प्रोत्साहनपर अनुदानाबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि शेतकऱ्यांसाठी (Farmer) अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे.
मित्रांनो हाती आलेल्या माहितीनुसार, राज्यातील नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना लवकरच 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान मायबाप शासनाकडून (Maharashtra Government) दिले जाणार आहे. एवढेच नाही तर या प्रोत्साहनपर अनुदानाच्या लाभार्थी शेतकऱ्यांची यादी देखील आता समोर आली आहे.
मित्रांनो आज आपण प्रोत्साहनपर अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांची यादी कुठे पाहायची तसेच प्रत्यक्ष अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर केव्हा वर्ग केली जाणार आहे याबाबत सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
प्रोत्साहनपर अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांची यादी कुठे बघायची
मित्रांनो हाती आलेल्या माहितीनुसार, प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांना 15 सप्टेंबर पासून मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, प्रोत्साहनपर अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांची यादी देखील आता सार्वजनिक करण्यात आली आहे. आता शेतकरी बांधवांचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे प्रोत्साहनपर अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांची यादी कुठे बघायची तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की शेतकरी मित्रांनो आपणास प्रोत्साहनपर अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांची यादी गावातील मुख्यालयात किंवा बँकेत बघायला मिळणार आहेत.
कोणते शेतकरी प्रोत्साहनपर अनुदानासाठी ठरणार आहेत पात्र
मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे, भूतपूर्व ठाकरे सरकारने आपल्या कार्यकाळात अगदी सुरुवातीच्या टप्प्यात महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना (Mahatma Jyotirao Phule Farmers Loan Waiver Scheme) लागू केली होती. या योजनेच्या (Farmer Scheme) माध्यमातून राज्यातील शेतकरी बांधवांची कर्जमाफी (Loan Waiver Scheme) करण्यात आली.
यादरम्यान ठाकरे सरकारने ज्या शेतकरी बांधवांनी नियमित कर्जाची परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहन देण्याचे ठरवले. त्यानुषंगाने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये दिले जाणार असा शासन निर्णय शासनाने त्यावेळी जारी केला. मात्र, त्यानंतर संपूर्ण जगावर कोरोना नामक आजाराने दस्तक दिली. यामुळे जवळपास संपूर्ण जग जणू काही थांबलं होतं. उद्योगधंदे ठप्प झाले होते.
अशा परिस्थितीत महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीत देखील मोठा खळखळाट होता. त्यामुळे प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम त्या वेळी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करता येणे अशक्य बनले होते. त्यानंतर गेल्या काही दिवसापूर्वी राज्यात सत्ताबदल झाला. शिवसेना पक्षात मोठी फूट पडली आणि वर्तमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत तब्बल 40 आमदार शिवसेना पक्षातून बाहेर पडले.
या बंडखोर आमदारांनी भाजपसोबत सोयरीक केली आणि राज्यात नवीन शिंदे सरकार प्रस्थापित झाले. खरं पाहता राज्यात शिंदे सरकार आले आणि ठाकरे सरकारचे सर्व निर्णय रिटर्न झाले. मात्र शिंदे सरकारने शेतकरी हिताचा प्रोत्साहनपर अनुदानाचा निर्णय जशाचा तसाच ठेवला.
आता शिंदे सरकार नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरच प्रोत्साहनपर अनुदान देणार आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांच्या मनात शंका निर्माण झाली आहेत की, कोणते शेतकरी यासाठी पात्र राहणार आहेत तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, प्रोत्साहनपर अनुदानाच्या रक्कमेसाठी 2017-18, 2018-19, 2019-2020 या कालावधीत नियमित कर्जाची परतफेड करणारे शेतकरी प्रोत्साहनपर अनुदान मिळण्यासाठी पात्र राहणार आहेत.
दरम्यान या योजनेचा किंवा अनुदानाचा लाभ घेण्यासाठी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना आपल्या बँक खात्यास आधार क्रमांक लिंक करणे अतिशय गरजेचे राहणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी बँक खात्याशी आपला आधार क्रमांक लिंक केलेला नसेल त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम दिली जाणार नसल्याचे सांगितले जात आहे.