Agriculture News : महाराष्ट्रासहित देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी हाती येत आहे. खरे तर देशातील शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे यासाठी शासन आणि प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आहे. कृषी शास्त्रज्ञांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध पिकांच्या जाती विकसित केल्या जात आहेत.
कडधान्य, तेलबिया, अन्नधान्य पिकांच्या वेगवेगळ्या जाती विकसित करून शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ घडवून आणण्याचा प्रयत्न गत काही वर्षांपासून कृषी शास्त्रज्ञांच्या आणि कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून अविरतपणे सुरू आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या कृषी विद्यापीठाने देखील शेतकऱ्यांसाठी आत्तापर्यंत विविध पिकाच्या शेकडो जाती विकसित केल्या आहेत. दरम्यान, राहुरी विद्यापीठाने संशोधित केलेल्या विविध पिकांच्या १८ वाणांना केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या भारत सरकारच्या गॅझेटमध्ये नुकतेच अधिसूचित करण्यात आले आहे.
हे वाण आता देश पातळीवर प्रसारित होणार असल्याने याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. कृषी विद्यापीठाने भात, मका, ज्वारी, करडई, तुर, मूग उडीद ऊस घेवडा गहू कापूस यासह इत्यादी पिकांच्या 18 जाती विकसित केल्या आहेत. या जाती आता फक्त महाराष्ट्रातच नाही तर देश पातळीवर प्रसारित होणार आहेत.
अर्थातच आता या नव्याने विकसित झालेल्या विविध पिकांच्या वाणाचा फायदा संपूर्ण देशाला होणार आहे. दरम्यान आता आपण राहुरी कृषी विद्यापीठाच्या ज्या 18 वाणाना देश पातळीवर प्रसारित करण्यात आले आहे त्या वाणाची माहिती जाणून घेऊयात.
या वाणाला देशपातळीवर प्रसारित करण्यास मान्यता
भात (फुले कोलम)
मका (फुले उमेद व फुले चॅम्पियन)
ज्वारी (फुले पूर्वा)
करडई (फुले भूमी)
तूर (फुले पल्लवी)
मूग (फुले सुवर्ण)
उडीद (फुले राजन)
राजमा (फुले विराज)
ऊस (फुले १५०१२)
घेवडा (फुले श्रावणी)
गहु (फुले अनुराग)
कापूस (फुले शुभ्रा)
टोमॅटो (फुले केसरी)
चेरी टोमॅटो (फुले जयश्री)
घोसाळे (फुले कोमल)
वाल (फुले सुवर्ण)
मेथी (फुले कस्तुरी)