Agriculture News : महाराष्ट्रसहित देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे कामाची बातमी समोर येत आहे. जर तुम्ही शेतकरी असाल आणि कांदा उत्पादन घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे. खरेतर, केंद्रातील मोदी सरकारने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात एक मोठा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार केंद्रातील मोदी सरकारने कांदा निर्यात बंदी लागू केली आहे.
सदर निर्णयानुसार केंद्रातील मोदी सरकारने 31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यात बंदी लागू केली होती. आठ डिसेंबर 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीत कांदा निर्यात बंदी लागू राहणार असा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला होता. मात्र, सरकारने नुकत्याच काही दिवसांपूर्वी कांदा निर्यात बंदीला मुदतवाढ देण्याचे जाहीर केले आहे.
जोवर पुढील आदेश प्राप्त होत नाही तोपर्यंत कांदा निर्यात बंदी सुरूच राहणार असा निर्णय सरकारने घेतलेला आहे. या निर्णयाचा मात्र कांदा उत्पादकांना मोठा फटका बसत असून सद्यस्थितीला कांद्याला अगदी कवडीमोल भाव मिळत आहे.
परिणामी ताबडतोब कांदा निर्यात बंदी उठवली गेली पाहिजे आणि महाराष्ट्रासहित संपूर्ण देशातील कांदा उत्पादकांना दिलासा दिला गेला पाहिजे अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांच्या माध्यमातून केली जात आहे.
दुसरीकडे काही तज्ञांनी कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय हा नवीन सरकार स्थापित झाल्यानंतरच होईल असे यावेळी म्हटले आहे. परिणामी तोपर्यंत कांदा उत्पादकांना कवडीमोल दरात कांदा विकावा लागू शकतो अशी भीती व्यक्त होत आहे.
अशातच मात्र कांदा उत्पादकांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे ती म्हणजे सरकारने UAE या देशाला पुन्हा एकदा अतिरिक्त 10,000 टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिलेली आहे.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी कांदा निर्यात बंदी सुरू असतानाही सरकारने आपल्या मित्र राष्ट्रांना 64,400 टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली होती. यात UAE ला सुद्धा कांदा निर्यात केला जाणार होता.
अशातच, आता पुन्हा एकदा सरकारने UAE ला दहा हजार टन अतिरिक्त कांदा निर्यात करण्यास मंजुरी दिली आहे. परकीय व्यापार महासंचालनालयाने याबाबतचे आदेश काढले आहेत. मात्र या निर्यातीचा शेतकऱ्यांना किती फायदा होणार हा मोठा सवाल आहे.
याबाबत तज्ज्ञांनी अस म्हटलं आहे की, कांद्याची निर्यात ही मर्यादीत प्रमाणात आहे, त्यामुळं सरकारच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना फारसा फायदा होणार नाहीये.
सध्या अनेक शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक आहे. पण कांदा निर्यातबंदी अजूनही सुरूच आहे, यामुळे मित्र देशांना मर्यादित कांदा निर्यातीस मंजुरी देण्याऐवजी कांदा निर्यात बंदी उठवली गेली पाहिजे अशी मागणी जोर धरत आहे.