Agricultural Scheme : शेती ही जमीन, पाणी आणि वीज या विना अपूर्ण आहे. या संसाधनांशिवाय शेती करणं म्हणजे अशक्य आहे. मात्र या आधुनिकीकरणाच्या युगात आता शास्त्रज्ञांनी अशी काही टेक्नॉलॉजी विकसित केली आहे ज्याच्या मदतीने शेतकऱ्यांना जमिनी विना देखील शेती करता येणार आहे.
एरोपोनिक्स किंवा हायड्रोपोनिक्स टेक्नॉलॉजीच्या मदतीने हे शक्य झालं आहे. मात्र जगाच्या पाठीवर अजून पाणी विना शेती करण्याचं तंत्रज्ञान विकसित झालेलं नाही आणि कदाचित भविष्यात देखील असं तंत्रज्ञान विकसित होणार नाही.
निश्चितच पाणी हे शेतीसाठी एक अविभाज्य घटक आहे. यामुळे पाणी व्यवस्थापन करताना शेतकरी बांधवांना वेगवेगळे साधने विकसित करावी लागतात.
पाण्याची उपलब्धता व्हावी या अनुषंगाने शेतकरी बांधवांना विहिरी, कुंपण नलिका, शेततळे उभारावी लागतात. पण या बाबींसाठी अधिकचा खर्च करावा लागतो. परिणामी बहुतांशी शेतकरी बांधव अजूनही पावसाच्या पाण्यावर शेती करत आहेत.
परंतु गेल्या काही वर्षांपासून पाण्याची सोय व्हावी या अनुषंगाने शासनाकडून शेतकरी बांधवांना अनुदान प्रोव्हाइड केलं जातं. यामध्ये विहिरी खोदण्यासाठी देखील अनुदान मिळतं. विशेष म्हणजे जुन्या विहिरी दुरुस्तीसाठी देखील अनुदानाच प्रावधान महाराष्ट्र कृषी विभागाकडून करण्यात आला आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना विहिरी खोदण्यासाठी आणि जुन्या विहिरी नूतनीकरणासाठी अनुदानाची सोय करून देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या इतर शेतकरी हिताच्या योजनेप्रमाणे ही देखील योजना महाडीबीटी पोर्टल अंतर्गत चालवली जात आहे.
ही योजना राज्यातील अनुसूचित जाती म्हणजेच शेड्युल कास्ट आणि नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी चालवली जात आहे. दरम्यान आज आपण या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे आणि पात्रतेची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
योजनेअंतर्गत विहिरीसाठी अनुदान मिळवणे हेतू आवश्यक कागदपत्रे
1- ही योजना केवळ शेड्युल कास्ट आणि नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे यामुळे अनुदान मिळवणे हेतू सक्षम प्राधिकारी कडील अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र
2- अर्जदार शेतकरी बांधवांचा सातबारा व आठ अ चा उतारा
3- अर्जदाराचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला
4- लाभार्थी अपंग असेल तर त्याचा पुरावा देखील सादर करावा लागणार आहे.
5- योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेत जमिनीचा दाखला आणि विहीर नसल्याचे प्रमाणपत्र
6- विहीर असेल तर विहीर सर्वे नंबर नकाशा व चतुर सीमा
7- भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडे पाणी उपलब्ध असल्याचा दाखला
8- कृषी अधिकाऱ्यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारस पत्र असणे आवश्यक
9- गटविकास अधिकार्याचे शिफारस पत्र व जागेचा फोटो
या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता
1-या राज्य शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी सदरील व्यक्ती अनुसूचित, एस सी जाती प्रवर्गातील असणे आवश्यक आहे, कारण की ही योजना शेड्युल कास्ट अंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे.
2- याशिवाय ही योजना गरीब शेतकऱ्यांसाठी आहे यामुळे सदर अर्जदार व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न मर्यादा एक ते दीड लाखांपर्यंतचं पाहिजे. यापेक्षा अधिक उत्पन्न असलेले शेतकरी यासाठी अपात्र ठरणार आहेत.
3- जमिनीचा सातबारा व आठ अ चा उतारा तसेच उत्पन्नाचा दाखला सादर करणे आवश्यक आहे.
4- योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्ती कडे किमान 0.20 हेक्टर ते सहा हेक्टर पर्यंत जमीन असणे आवश्यक आहे.