Agneepath Scheme : केंद्र शासनाने भारतीय सैन्य दलात अग्निपथ योजना सुरू केली आहे. या अग्निपथ योजनेच्या माध्यमातून भारतीय सैन्याच्या तिन्ही दलात सैनिकांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
या योजनेअंतर्गत भरली जाणारी सैनिकांची पदे हे तीन वर्षांच्या कालावधीसाठी राहणार आहेत. दरम्यान ही योजना सुरू झाल्यापासून या भरती प्रक्रियेत केंद्र शासनाच्या माध्यमातून वारंवार बदल केले जात आहेत. आता नुकताच केंद्र यां अग्निवीर भरतीच्या प्रक्रियेमध्ये मोठा बदल केला आहे.
केंद्र शासनाने नव्याने जारी केलेल्या बदलानुसार आता या भरतीसाठी आयटीआय पॉलिटेक्निक पास आऊट विद्यार्थी सुद्धा अर्ज करू शकणार आहेत. म्हणजेच आयटीआय पॉलिटेक्निक चे शिक्षण घेणारे विद्यार्थी आता या भरतीसाठी पात्र राहणार आहेत. म्हणजेच, या संबंधित शाखेतील विद्यार्थ्यांना विशेष प्रोत्साहन मिळणार आहे. यामुळे, पूर्व कुशल उमेदवार भरती होणार आहेत.
परिणामी प्रशिक्षणाचा बहुमूल्य वेळ वाचणार आहे. साहजिकच आता या नव्या नियमामुळे या पदभरतीसाठी मोठ्या प्रमाणात आयटीआय पॉलीटेक्निक चे विद्यार्थी देखील अर्ज करणार आहेत. आता या भरतीमध्ये आणखी उमेदवारांची संख्या वाढणार आहे. दरम्यान 16 फेब्रुवारी रोजी भारतीय लष्कराने पदभरती सुरू केली होती.
अग्निपथ योजनेच्या माध्यमातून ही पदभरती सुरू करण्यात आली. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. जे उमेदवार भारतीय सैन्यात जाऊ इच्छितात तसेच यासाठी आवश्यक पात्रता ग्रहण करतात त्यांनी भारतीय सैन्याच्या joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 15 मार्च 2023 ही ठेवण्यात आली आहे. यामुळे इच्छुक उमेदवारांना लवकरात लवकर यासाठी अर्ज करावयाचा आहे. यासाठी 17 एप्रिल 2023 ला निवड प्रक्रिया होणार आहे.
कोणत्या पदासाठी कोणती शैक्षणिक पात्रता
अग्निवीर पद भरती अंतर्गत जनरल ड्युटी या पदासाठी दहावी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
तसेच अग्निवीर तांत्रिक (सर्व शस्त्र) यासाठी बारावी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
अग्निविर लिपिक (स्टोअर कीपर) पदांसाठी बारावी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहे मात्र बारावी परीक्षेत किमान 60 टक्के गुणांसह परीक्षा पास आऊट होणे आवश्यक राहणार आहे.
अग्निगीर ट्रेडर्समन या पदांसाठी आठवी ते दहावी पास आऊट विद्यार्थी अर्ज करू शकणार आहेत.