Agriculture News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. केंद्र शासन देखील आपल्या स्तरावर देशभरातील शेतकऱ्यांसाठी कायमच नवनवीन उपक्रम राबवत असते.
दरम्यान महाराष्ट्रातील अपघातग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्यासाठी राज्य शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबांना एक लाखापासून दोन लाखांपर्यंतची मदत पुरवली जाते.
हे पण वाचा :- 5 हजार रुपये प्रति किलो दराने विकल्या जाणाऱ्या काळ्या हळदीची लागवड शेतकऱ्यांना बनवणार मालामाल ! पहा….
दरम्यान कृषी विभागाच्या माध्यमातून या योजने संदर्भात एक महत्त्वाची माहिती सार्वजनिक करण्यात आली आहे. यानुसार 7 एप्रिल 2022 ते 22 ऑगस्ट 2022 या खंडित कालावधीमध्ये या योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील 27 प्रस्तावा अंतर्गत 52 लाख रुपयाचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की या खंडित कालावधीमध्ये परभणी जिल्ह्यात एकूण 44 प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यापैकी 27 प्रस्ताव मंजूर झाले असून त्यांना 52 लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.
तालुक्यानुसार वाटप झालेला निधी
परभणी तालुक्यातील एक प्रस्ताव मंजूर झाला असून संबंधित शेतकरी कुटुंबांच्या वारसांना दोन लाख रुपये वितरित झाले आहेत.
मानवत तालुक्यातील एक प्रस्ताव मंजूर झाला असून संबंधित शेतकरी कुटुंबांच्या वारसांना दोन लाख रुपये वितरित झाले आहेत.
गंगाखेड आणि पालम या दोन तालुक्यातील प्रत्येकी दोन असे एकूण चार प्रस्ताव मंजूर झाले असून प्रत्येकी 8 लाख रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहेत.
जिंतूर आणि पूर्णा तालुक्यातील प्रत्येकी चार प्रस्तावांतर्गत एकूण 16 लाख वितरित झाले आहेत.
सोनपेठ तालुक्यातील 6 प्रस्तावाअंतर्गत 11 लाख रुपये वितरित झाले आहेत.
सेलू तालुक्यातील सात प्रस्तावांतर्गत 13 लाख रुपये वितरित झाले आहेत.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की या योजनेअंतर्गत 2019-20 मध्ये 100 प्रस्ताव दाखल झालेत, यापैकी 62 प्रस्ताव मंजूर झालेत आणि दोन प्रस्ताव प्रलंबित आहेत. तसेच 2021 22 मध्ये 106 प्रस्ताव दाखल झाले त्यापैकी 52 प्रस्ताव मंजूर झाले आहेत, 36 प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहेत.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! शेतकऱ्यांच्या पीककर्जासंदर्भात झाला मोठा निर्णय; राज्यस्तरीय बँकर्स कमिटीने दिलेत ‘हे’ आदेश