Aeroponic Farming: शेती (Agriculture) म्हटलं की शेतजमीन आलीच. शेतजमिनी विना शेती (Farming) करणं म्हणजे जवळपास अशक्य असत असा आतापर्यंत आपला सर्वांचा समज होता. मात्र शेतजमिनी विना देखील शेती करता येते असे नवनवीन तंत्र शेती व्यवसायात दाखल झाले आहेत.
यामुळे शेतकरी बांधवांना (Farmer) शेती करताना सोयीचे होत आहे शिवाय उत्पादनात (Farmer Income) भरीव वाढ होत आहे. मित्रांनो शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आता चक्क हवेत बटाट्याचे उत्पादन घेता येणार आहे.
हवेत बटाटे उत्पादित करण्याच्या या तंत्रास एरोपोनिक फार्मिंग असे नाव देण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने हवेत बटाटा उत्पादित (Potato Farming In Air) केला जातो यामुळे बटाट्याला रोग लागत नाहीत परिणामी उत्पादन चांगले आणि दर्जेदार येते.
या नवीन तंत्रज्ञानामुळे (aeroponic farming) शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल बर…!
मित्रांनो भारताच्या शेती व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा समावेश आता होत असून एरोपोनिक तंत्रज्ञान हे देखील असाच एक नवीन तंत्रज्ञान आहे. याचा शोध हरियाणातील कर्नाल जिल्ह्यात असलेल्या बटाटा तंत्रज्ञान केंद्राने लावला आहे. तज्ज्ञांच्या मते, या तंत्राने लागवड केल्यास बटाट्याचे उत्पादन 10 पटीने वाढते.
या तंत्राने शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारने मान्यताही दिली आहे. हरियाणाच्या कर्नाल जिल्ह्यात असलेल्या सेंटर फॉर बटाटा टेक्नॉलॉजीनुसार बटाटा बियाणांची उत्पादन क्षमता 3 ते 4 पटीने वाढू शकते. केवळ हरियाणाच नाही तर इतर राज्यातील शेतकऱ्यांनाही या तंत्रज्ञानाचा फायदा होणार आहे.
या नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून इतर भाज्यांचीही लागवड (vegetable farming) करता येते बर..!
हे नवीन एरोपोनिक तंत्र पालेभाज्या, स्ट्रॉबेरी, काकडी, टोमॅटो आणि औषधी वनस्पतींच्या उत्पादनासाठी वापरले जात आहे. शेतकर्यांमध्ये एरोपोनिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी, हरियाणातील कर्नाल येथे स्थित इंटरनॅशनल बटाटो सेंटर ऑफ बटाटा टेक्नॉलॉजी सेंटरसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. याशिवाय शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमही आयोजित करण्यात येत आहेत.