Maharashtra Rain : राज्यात गेल्या दहा दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे. गेल्या 9 ते दहा दिवसांपासून म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यातला पावसाचा जोर ओसरला आहे. पावसाने विश्रांती घेतली असल्याने शेतकऱ्यांची काळजी देखील वाढत आहे. गेल्या महिन्यात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. मात्र या चालू ऑगस्ट महिन्यात आणि सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणारा असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
यामुळे यंदा दुष्काळ तर नाही ना पडणार ? असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित होत असून पावसाबाबत त्यांच्या मनात संभ्रम अवस्था पाहायला मिळत आहे. अशातच भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून पुढील पाच दिवसाचा हवामान अंदाज सार्वजनिक करण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अर्थातच जुलै प्रमाणे जोरदार पाऊस या चालू महिन्यात पडणार नसल्याचे सांगितले जात आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी याबाबत माहिती दिली. कृष्णाानंदजी यांनी सांगितल्याप्रमाणे पुढील चार ते पाच दिवसात राज्यात मध्यम ते हलका पाऊस होईल. तसेच राज्यात पावसाचा जोर कमी झाला असल्याचे त्यांनी सांगितले असून येत्या 24 तासात राज्यातील कोणत्याच भागासाठी येल्लो, ऑरेंज आणि रेड अलर्ट देण्यात आला नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
एकंदरीत राज्यात कुठेच मुसळधार पावसाचा इशारा नाहीये. केवळ हलक्या सऱ्या बरसतील असे मत हवामान तज्ज्ञांच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. कृष्णानंदजी यांनी सांगितल्याप्रमाणे, राज्यात पुढील 24 तासात हलका ते मध्यम पाऊस पडणार असून राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात 65 मिमीपर्यंतचा पाऊस होणार असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
निश्चितच, आगामी चार-पाच दिवस अर्थातच 13 ते 14 ऑगस्टपर्यंत राज्यात हलका ते मध्यम पाऊस पडणार असे मत IMD ने व्यक्त केले असल्याने राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे. आता शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिकांसाठी आणि रब्बी हंगामासाठी मुसळधार पावसाची आतुरता लागून आहे.