Fruit Farming : भारतात गेल्या काही दशकांपासून शेती व्यवसायात (Farming) मोठा अमुलाग्र बदल बघायला मिळत आहे. खरं पाहता आता उत्पन्न (Farmer Income) वाढीच्या अनुषंगाने शेतकरी बांधव (Farmer) शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग राबवत असल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे शेतकऱ्यांकडून सुरु करण्यात आलेल्या वेगवेगळ्या प्रयोगांच्या माध्यमातून त्यांना चांगली बक्कळ कमाई (Farmer Income) देखील होत आहे. मित्रांनो आता शेतकरी बांधव पारंपरिक पिकांपेक्षा फळबाग शेतीकडे अधिक वळत असल्याचे चित्र आहे. स्ट्राबेरी (Strawberry Crop) हे देखील असचं एक फळपीक असून या पिकाची आपल्या देशात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते.
आपल्या राज्यातील शेतकऱ्यांनी देखील आता मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी या फळबाग पिकाची शेती (Strawberry Farming) सुरू केली आहे. या पिकाच्या शेतीतून आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांना चांगली बक्कळ कमाई होत आहे. जाणकार लोकांच्या मते शेतकरी बांधवांनी काही गोष्टींची काळजी घेतल्यास या पिकातून त्यांना चांगली कमाई होणार आहे.
अशा परिस्थितीत आहात आपण स्ट्रॉबेरी शेतीतील काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. स्ट्रॉबेरी हे भारतातील महत्त्वाचे फळ पीक आहे. हे देशभरात मोठ्या प्रमाणात विकले जाते आणि ते खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि राजस्थानमध्ये या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.
मित्रांनो अस सांगतात की, डोंगराळ भागात स्ट्रॉबेरी पिकवण्याचा उत्तम काळ हा सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यातला आहे. अशा परिसरात स्ट्रॉबेरीची लवकर लागवड केल्यास त्याचे उत्पादन कमी होऊ शकते. यामुळे शेतकरी बांधवांनी याची देखील काळजी घेतली पाहिजे. शेतकरी बांधवांनी स्ट्रॉबेरी पिकाची लागवड करण्याआधी एकदा तज्ञ लोकांचा सल्ला घेणे अपरिहार्य राहणार आहे. मित्रांनो याच्या कमाईच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आम्ही आपणास एका महिला शेतकऱ्याच उदाहरण देऊ इच्छितो.
मित्रांनो झाशी येथील महिला शेतकरी गुरलीन चावला यांनी स्ट्रॉबेरीच्या शेतीच्या माध्यमातून आपली व आपल्या परिवाराची आर्थिक परिस्थिती बदलून टाकली आहे. गुरलीन या प्रयोगशील महिला शेतकऱ्याने तिच्या वडिलांसोबत टेरेसवर स्ट्रॉबेरीची लागवड केली होती. यात यशस्वी झाल्यानंतर त्यांनी 2020 च्या लॉकडाऊनमध्ये 1.5 एकरमध्ये या पिकाची लागवड सुरू केली. यातून त्यांना 6 लाख खर्चून 30 लाखांचा नफा झाला.
निश्चितच स्ट्रॉबेरी पिकाची तज्ञ लोकांच्या सल्ल्याने लागवड केल्यास आणि योग्य व्यवस्थापन केल्यास यातून लाखो रुपयांची कमाई होणार आहे. गुर्लेनने 1800 हजार स्ट्रॉबेरीची रोपे लावली होती. यासाठी त्यांना जवळपास सहा लाख रुपयांचा खर्च आला. यामध्ये शेणखत, सेंद्रिय खत, वनस्पतींखाली पॉलिथिन घालणे आणि पाण्याच्या पाईपलाईन इ. खर्चाचा समावेश करण्यात आलेला आहे. या महिलेने उत्पादित केलेल्या स्ट्रॉबेरी पिकाला तीनशे ते सहाशे रुपये किलोचा बाजार भाव मिळाला होता.