Weather Update : राज्यात मोसमी पावसाला (Rain) पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. ऑगस्ट महिन्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने (Maharashtra Rain) सप्टेंबरमध्ये पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. राज्यात गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी अतिवृष्टी सारखा पाऊस (Heavy Rain) कोसळला आहे.
यामुळे खरीप हंगामातील (Kharif Crop) पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. राज्यातील पुणे आणि सोलापूर या पश्चिम महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यात काल मुसळधार पाऊस झाला. दरम्यान काल राजधानी मुंबई ठाणे आणि कोकणातील अनेक जिल्ह्यात काल पावसाची हजेरी बघायला मिळाली.
आता भारतीय हवामान विभागाने (IMD) आपला सुधारित हवामान अंदाज वर्तवला असून आगामी काही दिवस पावसाची (Monsoon) शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने नमूद केले आहे. भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाजानुसार, येत्या 24 तासात राज्यातील अनेक भागात पावसाची (Monsoon News) शक्यता आहे.
विदर्भातील अनेक जिल्ह्यात 13 सप्टेंबर पर्यंत पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने नमूद केले आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. अशा परिस्थितीत विदर्भ वासियांना सतर्क राहण्याची गरज भासणार आहे. जाणकार लोकांच्या मते शेतकरी बांधवांनी पावसाचे वातावरण तयार झाले की लगेच आपले जर जवळ करावे तसेच या कालावधीत आपल्या पशुधनाची देखील शेतकरी बांधवांनी काळजी घ्यायला हवी.
दरम्यान, शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी देखील समोर येत आहे. मित्रांनो जस की आपणास ठाऊकच आहे जून ते ऑगस्ट या महिन्यांत राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी सारखा पाऊस झाला होता. त्यावेळी झालेल्या पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांची अक्षरशः होळी झाली होती.
दरम्यान आता जून ते ऑगस्ट या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्या शेतकरी बांधवांच्या खरीप हंगामातील पिकांची नासाडी झाली आहे अशा शेतकरी बांधवांना आता मायबाप शासनाकडून नुकसानभरपाई दिली जाणार आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की मायबाप शासनाने अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना मदत म्हणून 3,501 कोटी रुपयांची नुकसानभरपाई जाहीर केली आहे.
सदर नुकसान भरपाई संबंधित शेतकरी बांधवांना सोमवार पासून मिळणार असल्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी नमूद केले आहे. सदर नुकसानभरपाई शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात मिळणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता देखील म्हटले असल्याचे जाणकार नमूद करत आहेत.