Farming Business Idea : आपल्या देशात शेती (Farming) मोठ्या प्रमाणावर केली जाते. शेतीमध्ये अनेक पिके घेतली जातात, पण अलीकडे अधिक नफा मिळवून देणाऱ्या काही झाडांची देखील लागवड (Tree Farming) आपल्या देशात शेतकरी बांधव करत आहेत.
आज आम्ही तुम्हाला येथे अशाच काही झाडांची माहिती देत आहोत. ज्याची लागवड करून तुम्ही तुमची शेती समृद्ध करू शकता, तसेच या झाडांच्या उत्पादनातून लाखो रुपये कमवू शकता.
शेतकऱ्यांना कोट्याधीशबनवणारी झाडे खालीलप्रमाणे :-
चंदनाचे झाड (Sandalwood Farming)
चंदनाचे झाड हे जगातील सर्वात महागड्या झाडांपैकी एक आहे. त्याच्या एक किलो लाकडाची किंमत 27 हजार रुपये आहे. एका चंदनाच्या झाडापासून तुम्हाला 15 ते 20 किलो लाकूड मिळते. त्यामुळे हे झाड लावून तुम्ही मोठे होईपर्यंत थोडा संयम ठेवलात तर हे एक झाड तुम्हाला करोडपती बनवू शकते.
सागवान झाड (Teak Wood Farming)
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, हे झाड लाकडाच्या ताकदीसाठी ओळखले जाते. त्याचे लाकूड मोठ्या इमारतींमध्ये वापरले जाते. अवघ्या 12 वर्षात या झाडाची किंमत 20 ते 25 हजार रुपये होते.
निलगिरी झाड (Eucalyptus Farming)
हे एक कमी खर्चात लागवड करता येणारे पीक आहे. याच्या झाडाला जास्त पाणी लागत नाही. या झाडाची अजून एक विशेषता या झाडाची फारशी काळजीही घ्यावी लागत नाही. हे झाड 8 ते 10 वर्षात तयार होते. त्यातून औषधी तेल काढले जाते.
महोगनी झाड (Mahogany Farming)
या झाडाचे लाकूड पाणी प्रतिरोधक आहे. त्याच्या लाकडावर पाण्याचा कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळेच त्याचे लाकूड महागडे विकले जाते. या झाडाच्या लाकडाची किंमत 2 हजार ते 2700 रुपये प्रति किलो आहे.
शिवणचे झाड (Gamhar Tree)
एक एकरात हे झाड लावल्यास एक कोटी रुपये सहज मिळू शकतात. हे एक औषधी वृक्ष असून इमारतींमध्येही त्याचे लाकूड वापरले जाते. कमी पाऊस असलेल्या भागात ही झाडे जास्त वाढतात. ते त्यांच्या जमिनीत नायट्रोजन आणि फॉस्फरसचे प्रमाण वाढवतात. त्यामुळे त्या जमिनीचे पीकही चांगले येते.