Weather Update : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाला (Rain) पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. दरम्यान आज देखील भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रात पावसाची (Maharashtra Rain) शक्यता वर्तवली आहे.
तत्पुर्वी संपूर्ण भारताचा विचार करता आज उत्तर भारतात पुन्हा एकदा हवामानात बदल (Climate Change) होतं असल्याचे हवामान विभागाकडून नमूद करण्यात आले आहे. उत्तर भारतातील उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब आणि हरियाणामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस (Monsoon) सुरू आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत आज 11 सप्टेंबर रोजी किमान तापमान 27 अंश आणि कमाल तापमान 36 अंश राहणार आहे. राजधानी दिल्लीत आज हलके ढगाळ हवामान राहणार आहे. तसेच आज लखनऊमध्ये कमाल तापमान 27 अंश आणि किमान तापमान 34 अंश सेल्सिअस असू शकते.
या दोन्ही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस (Monsoon News) पडण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर आज भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अद्ययावत माहितीनुसार काल महाराष्ट्रातील मुंबई ठाणे तसेच पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यात पाऊस झाला आहे. आजदेखील महाराष्ट्रातील कोकण विभागात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून कोकण विभागाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
याशिवाय उर्वरित महाराष्ट्राला पावसाचा येलो ॲलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या आपल्या नवीन अंदाजानुसार, उद्यापासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. उद्या, 12 सप्टेंबर पासून राज्यातील अनेक विभागात पावसाचा जोर वाढणार आहे.
उद्यापासून कोकणसह ठाणे आणि मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली असून पश्चिम महाराष्ट्रातील घाट माथ्यावर देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याने संबंधित विभागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन देखील यावेळी भारतीय हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.