Goat Farming Tips : मित्रांनो, भारतात पशुपालन (Animal Husbandry) हा एक मुख्य व्यवसाय आहे. देशातील अल्पभूधारक शेतकरी बांधव (Farmer) शेळीचे मोठ्या प्रमाणात संगोपन करत असतात. आपल्या राज्यातही शेळीपालन (Goat Rearing) मोठ्या प्रमाणात केला जाते.
शेळीपालन व्यवसाय कमी खर्चात आणि कमी जागेत सुरू करता येत असल्याने अलीकडे नवयुवक शेतकरी बांधव देखील शेळीपालन व्यवसायास अधिक पसंती दर्शवित आहेत. मित्रांनो जाणकार लोकांच्या मते, शेळी पालन हा निश्चितच शेतकऱ्यांसाठी फायद्याचा सौदा सिद्ध होणार आहे.
मात्र या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी शेळी पालन करणाऱ्या पशुपालक शेतकऱ्यांना काही गोष्टींची काळजी देखील घ्यावी लागणार आहे. आज आपण शेळी पालन करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी शेळीपालन व्यवसायात यशस्वी होण्याकरिता काही महत्वाच्या टिप्स (Goat Care) घेऊन हजर झालो आहोत. चला मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
शेळीपालन व्यवसायात यशस्वी होण्यासाठी खालील टिप्सचा अवलंब करा
5-10 शुद्ध जातीच्या शेळ्यांपासून (Goat Breed) शेळीपालन सुरू करा, आणि अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या.
शेळीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेळ्यांचा विमा काढावा जेणेकरुन त्यांच्या संभाव्य नुकसानीची भरपाई मिळू शकेल.
शेळीपालकांनी चांगल्या जातीची शेळी वजनामुळे विकू नये, तर याद्वारे शेळ्यांची पैदास वाढवावी.
बाजारात कॅन केलेला मांसाची मागणी वाढत आहे. या संदर्भात शेळीपालन हा आता फायदेशीर व्यवसाय बनत चालला आहे.
शेळ्यांना चांगल्या दर्जाचा खुराक, चारा, ओला सुका चारा दिला पाहिजे.
शेळ्यामध्ये रोग आढळल्यास त्वरित पशुवैद्यकांचा सल्ला घेतला पाहिजे.
शेळीच्या गोठ्यात स्वच्छता ठेवली पाहिजे तसेच त्यांना स्वच्छ पाणी प्यायला दिले पाहिजे.
याशिवाय शेळ्यांमध्ये लसीकरण देखील केले पाहिजे.
शेळ्यांमध्ये साथीचे आजार आढळल्यास निरोगी शेळ्या दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केल्या पाहिजेत.
शेळीच्या दुधालाही बाजारात मागणी आहे. साबण, शाम्पू उत्पादक त्याचे दूध खरेदी करतात. त्याचबरोबर संसर्गजन्य आजारांमध्ये शेळीचे दूध खूप फायदेशीर आहे. त्यामुळे त्याच्या दुधातूनही भरपूर पैसे मिळू शकतात.
शेळीपालनातून शेतकरी कसे बक्कळ पैसे कमवू शकतात
शेळ्यांचे दूध विकून शेतकरी या व्यवसायातून कमाई करू शकतात.
शेळ्यांचे मांस विकूनही शेतकऱ्यांना त्यातून पैसे मिळू शकतात.
शेळ्या किंवा मेंढ्यांच्या लोकर आणि कातडीपासूनही उत्पन्न मिळू शकते.
त्याच बरोबर सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक शेळ्यांचे लेंडी खत विकून देखील पैसे मिळवता येतात.
शेळीपालनासाठी बँकेकडून कर्ज घेऊ शकता
नाबार्ड अंतर्गत बँका शेळीपालनासाठी शेतकऱ्यांना कर्ज देतात. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय बँक, कॅनरा बँक इत्यादी बँकांचा समावेश आहे. या बँका शेळीपालनासाठी 50 हजार ते 50 लाखांपर्यंत कर्ज देतात.
10 शेळ्यांपासून शेळीपालन व्यवसाय सुरू केल्यास तुम्हाला 4 लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते. या बँकांशिवाय नाबार्डकडून शेतकऱ्यांना कर्ज आणि अनुदानाची सुविधाही दिली जात आहे. शेळीपालनासाठी कर्ज घेणाऱ्या शेतकरी व पशुपालकांना वार्षिक 11.20 टक्के दराने व्याज भरावे लागते.