Agriculture News : भारतात शेतीमध्ये (Farming) मोठा बदल झाला आहे. खरं पाहता, उत्पादन वाढीच्या अनुषंगाने गेल्या काही दशकापासून रासायनिक खतांचा (Chemical Fertilizer) अनिर्बंध वापर सुरु आहे.
यामुळे तसेच हवामान बदलाच्या (Climate Change) दुष्परिणामांमुळे शेतीजमीन स्वतःची सुपीक शक्ती (Soil Fertility) गमावत आहे. त्यामुळे पिकांचे उत्पादनही कमी होत असून शेतकरी (Farmer) सतत तोट्यात जात आहेत.
या समस्येला सामोरे जाण्यासाठी विविध प्रकारची खतांचा वापर केला जातो, परंतु योग्य वापराचा मार्ग माहित नसल्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा त्याच नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी खते (Chemical Fertilizer) वापरण्याची योग्य वेळ आणि योग्य पद्धत जाणून घेतली पाहिजे, जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारचा धोका पत्करावा लागणार नाही.
नायट्रोजन खत
भातासारख्या पारंपारिक पिकांमध्ये (Traditional Crops) नायट्रोजन खताचा वापर केला जातो. अनेक शेतकरी थेट पिकावर नायट्रोजनची (Nitrogen) फवारणी करतात, त्यामुळे पिकात विकृती निर्माण होते. कृषी तज्ज्ञांच्या मते, माती परीक्षणाच्या आधारेच संतुलित प्रमाणात या खताचा वापर केला गेला पाहिजे. याव्यतिरिक्त, नायट्रोजन तसेच काही प्रमाणात फॉस्फरस आणि पोटॅश देखील समाविष्ट केले पाहिजे, ज्यासाठी NPK मिश्रित खत वापरण्याची शिफारस केली जाते.
योग्य वेळी झाला पाहिजे खतांचा वापर
शेत तयार करण्यापासून ते पिकांच्या चांगल्या उत्पादनापर्यंत खते महत्त्वाची भूमिका बजावतात. काही खत-खाद्य शेताची नांगरणी करताना, लावणीच्या वेळी, फळधारणेच्या वेळी आणि पिकामध्ये पोषणाची कमतरता असताना देखील वापरली जातात, जेणेकरून झाडांना योग्य पोषण मिळू शकेल.
सेंद्रिय खताचा वापर चांगल्या प्रमाणात करता येतो, मात्र रासायनिक खतांचा किंवा पोषक घटकांचा वापर कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावा. काही वेळा रासायनिक खतांच्या वापरामुळे पिकात विकृती निर्माण होतात. त्यामुळे त्याची गुणवत्ता ढासळते आणि शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव मिळत नाही.
नवीन खतांचा वापर
शेणखत जितके जुने असते, तितकेच पिकासाठी आणि जमिनीसाठी फायदेशीर ठरू शकतात, उदाहरणार्थ, शेणखत चांगले कुजलेले वापरल्याने जमिनीत जिवाणूंची संख्या वाढते आणि झाडांची वाढ योग्य प्रकारे होते. दुसरीकडे, जीवामृतसह उर्वरित सेंद्रिय खते ताजी बनवल्यानंतरच वापरण्याचा सल्ला दिला जातो.
जर तुम्ही बाजारातून रासायनिक खते किंवा पोषक तत्वे खरेदी करत असाल तर पॅकेट किंवा गोणीच्या मागील बाजूस एक्सपायरी डेट पाहूनच खरेदी करा. एवढेच नाही तर वापरानंतरही खत-खाद्य किंवा पोषक घटकांचे पाकीट सुरक्षित ठेवावे.
योग्य प्रमाण वापरा
अनेकदा व्यावसायिक शेती करणारे शेतकरी पिकांचे अधिक उत्पादन घेण्यासाठी अधिक खतांचा वापर करतात. यामुळे संसाधने तर खर्च होतातच शिवाय अतिरिक्त खर्चही होतो. यामुळे शेतकरी कर्जबाजारी होतो. इतकेच नव्हे तर खते जास्त प्रमाणात वापरल्याने जमिनीची रचना बिघडते आणि प्रदूषणही वाढते.
काही वेळा खतांमुळे भूजल पातळीही घसरायला लागते. खतांचा अंदाधुंद वापर पर्यावरणाबरोबरच मानवी आरोग्यासही घातक ठरू शकतो, त्यामुळे कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच खतांचा समतोल प्रमाणात वापर करावा.